मॉड लूकमध्ये होणार मधुवंतीची एन्ट्री

    दिनांक :23-Nov-2019
|
'भागो मोहन प्यारे' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. मधुवंती नावाचं संकट मोहनच्या आयुष्यातून निघून गेल्यामुळे तो थोडा सुखावला आहे. काही दिवस मालिकेपासून लांब असलेली मधुवंती म्हणजेच अभिनेत्री सरीता मेहंदळे नव्या रुपात मालिकेत दिसणार आहे. कारण लवकरच मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे. येत्या काही दिवसात मधुवंती फोटो दिसत असल्याप्रमाणे मॉडर्न रूपात पाहायला मिळणार आहे.