राणीने केला रणवीरचा लूक कॉपी

    दिनांक :25-Nov-2019
|
मुंबई,
रणवीर सिंह आपला लूक आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत असतो. अनेकदा तो इव्हेंट्ससाठी अतरंगी आउटफिट्स ट्राय करताना दिसतो. त्यामुळे अनेकदा तो ट्रोलही होतो आणि आउटफिट्सच्या चर्चाही होताना दिसतात. पण याचबरोबर रणवीर अनेकांचा फॅशन आयकॉनही आहे. आता अभिनेत्री राणी मुखर्जी रणवीर सिंहला कॉपी करताना दिसत आहे. सोशल मीडियावर रणवीर सिंह आणि रानी मुखर्जीचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच या दोघांच्या आउटफिट्सवरून चर्चाही होत आहेत.
 

 
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रणवीर आणि राणी एकसारख्याच आउटफिट्समध्ये दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने दोघे तिरूपती बालाजी आणि अमृतसरमध्ये दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर रणवीर आपल्या ट्रेडिशनल लूकबाबत लाइमलाइटमध्ये आले होते. यादरम्यान त्यांनी फ्लोरल प्रिंट कॉपर कलर्ड मॅटेलिक कुर्ता आणि पायजामा वेअर केला होता. याचसोबत रणवीरने आपला लूक पूर्ण करण्यासाठी मॅचिंग नेहरु जकेट वेअर केलं होतं.
आता रणवीरच्या लूकच्या आणखी चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राणी मुखर्जीचे काही फोटो सेम आउटफिट्समध्ये व्हायरल होत आहेत. यानंतर दोघांचा लूक कम्पेअर करण्यात येत आहे आणि त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये तुम्हा पाहू शकता की, राणी मुखर्जीचा कुर्ता रणवीरच्या कुर्त्यासारखाच आहे. तसेच राणीने आपला लूक एका नेटेड दुपट्ट्यासोबत कंम्पलिट केला आहे.
दरम्यान, राणी मुखर्जीने काही दिवसांपूर्वी कोलकतामध्ये आपला आगामी चित्रपट 'मर्दानी 2'च्या प्रमोशनमध्ये हा ड्रेस वेअर केला होता.