साऊंड एडिटरच्या निधनानं अक्षय भावूक

    दिनांक :26-Nov-2019
|
मुंबई,
बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये साऊंड एडिटर म्हणून काम पाहिलेल्या निमिष पिळणकरचं उच्च रक्तदाबानं ब्रेन हॅमरेज होऊन निधन झालं. निमिषच्या निधनानंर अभिनेता अक्षय कुमार यानं ट्विट करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

 
'निमिष पिळणकरच्या निधनाची बातमी समजली. अतिशय कमी वयात निमिषचं निधन झालं, ही मनाला चटका लावून टाकणारी बाब आहे. त्याच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे' असं अक्षयनं म्हटलं आहे.
निमिष अवघ्या २९ वर्षांचा होता. निमिषनं सलमान खानच्या 'रेस-३' या चित्रपटात पहिल्यांदा साऊंड एडिटर म्हणून काम केलं होतं. याशिवाय त्यानं 'हाऊसफुल -४', 'बाईपास रोड', 'मारजावां', 'केसरी', 'जलेबी' या चित्रपटांसाठी काम केलं आहे. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि पत्रकार खालिद मोहम्मद यांनी निमिषच्या मृत्यू बद्दल ट्वीट केल्यानंतर निमिषच्या निधनाची बातमी समोर आली. सुत्रांच्या माहितीनुसार निमिषवर कामाचा प्रचंड ताण होता. त्याची तब्येत अचानक बिघडली आणि मेंदूच्या नसा तुटल्यानं त्याचा मृत्यू झाला.
'साउंड टेक्निशिनयन निमिष पिळणकरचा वयाच्या २९ व्या वर्षी मृत्यू झाला. हे टेक्निशिनयनच सिनेमांचा ‘कणा’असतात. मात्र त्यांची पर्वा कोणालाच नसते. सर्व संघटना स्टार्स आणि निर्मात्यांनी आता झोपेतून जागं होण्याची ही वेळ आहे', असं खालिदनं त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.