शिव आणि वीणाचा टिक टॉक व्हिडिओ व्हायरल

    दिनांक :26-Nov-2019
|
मुंबई,
बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात ज्या जोडीची सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे विजेता ठरलेला शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप. शिव आणि विना यांनी बिग बॉसच्या घरात एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळं त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली. त्यांच्यातलं हे प्रेम केवळ बिग बॉसच्या घरापुरतं आहे की, भविष्यातही ते एकत्र राहणार आहेत का? असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात येत होते. परंतू या सर्व प्रश्नांना शिव आणि वीणा यांनी उत्तर दिलं आहे.

 
बिग बॉसचा शो संपून दोन महिने उलटून गेले असले तरी शिव आणि वीणा यांच्यातलं प्रेम हे दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकल्यास त्यांनी शेअर केलेले फोटो पाहायला मिळतात. त्यापैकी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. शिव आणि वीणा यांनी पहिल्यांदाच एक टिकटॉक व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओत शिव 'प्यार तुझे करता हूँ देख मेरे आँखों में या गाण्यातून वीणाकडे प्रेम व्यक्त करताना दिसतोय आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत असून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी शिवच्या वाढदिवसासाठी वीणानं त्याला एक गोड सरप्राईज दिलं होतं. वीणानं बर्थडे गिफ्ट म्हणून शिवच्या नावाचा टॅटू हातावर काढला आहे. शिवनं वीणाचा टॅटू जसा काढलाय तसाच आणि त्याच जागेवर वीणानं टॅटू काढला आहे.