कंगनाच्या चेहऱ्यावर किलोभर मेकअप

    दिनांक :26-Nov-2019
|
 
 
 
 
अभिनेत्री आणि दाक्षिणात्य दिवंगत ज्येष्ठ नेत्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलायवी' हा चित्रपट लवकरच येतोय. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. अभिनेत्री कंगना रनौट यामध्ये मुख्य भूमिकेत झळकतेय. नेहमी आव्हानात्मक भूमिका साकारणाऱ्या कंगनाच्या 'थलायवी' रुपाबद्दल चाहत्यांना उत्सुकता होती. पण, टिझर प्रदर्शित झाल्यानंतर त्याची जितकी प्रशंसा झाली त्यापेक्षा त्यावर टीका जास्त झाली. 'चेहऱ्यावर एक किलोचा मेकअप लावल्याप्रमाणे ती दिसतेय. तिचं हे बनावट रुप बिलकूल आवडलं नाही' अशा शब्दांत तिची खिल्ली उडवली गेली.