सुपरस्टारची क्रेझ चाहत्यांचा अनोखा पराक्रम

    दिनांक :27-Nov-2019
|
हैदराबाद,
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू म्हणजे रेकॉर्ड ब्रेक करण्याची मशिनच आहे. तो आपल्या प्रत्येक सिनेमातून आधीचे स्वतःचे रेकॉर्ड ब्रेक करत जातो. त्याचा आगामी 'सरिलरू नीकेवरू' हा सिनेमा प्रदर्शित व्हायला ५० दिवस शिल्लक असताना त्याच्या नावावर अजून एका रेकॉर्डची नोंद झाली. सुपरस्टार महेश बाबूचा तब्बल ८१ फुटांचा कटआउट उभा करण्यात आला.
 

 
 
सुदर्शन ३५एमएम सिनेमागृहात या हटके अभिनेत्याचा ८१ फुटांचा कटआउट उभा करण्यात आला. असं म्हटलं जातं की, हैदराबादमधील आरटीसी क्रॉसरोड येथील सुदर्शन ३५एमएम सिनेमागृहात महेश बाबूचे सर्व ब्लॉकबस्टर सिनेमे अफलातून कमाई करण्यात यशस्वी झाले आहेत. यामुळेच महेश बाबूचं हे कटआउट त्याचा आगामी 'सरिलरू नीकेवरू' सिनेमा सुपरहिट होईल याची ग्वाही देतो.