या सुपरस्टारने घेतलं चक्क १५ कोटींचं घर

    दिनांक :27-Nov-2019
|
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडाने नुकतंच एक आलिशान घर घेतलं. विजयने कुटुंबासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. अर्जुन रेड्डी, गीत गोविंदम, टॅक्सीवाला यांसारखे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर आता त्याने नवीन घरंही घेतलं. त्यामुळे त्याचा आनंद द्विगुणीत झाला असेल यात काही शंका नाही. सिनेमांमध्ये सतत मिळणाऱ्या यशानंतर आता त्याने १५ कोटींचं घर घेतलं आहे. विजयने हैदराबाद येथील जुबली हिल्स येथे एक भव्य घर विकत घेतलं. रिपोर्टनुसार विजयने जवळच्या कुटुंबियांसोबत गृहप्रवेश केला.

 
 
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओत विजयचं पूर्ण कुटुंब पारंपरिक वेशात दिसत आहेत. यात विजयचा छोटा भाऊही दिसत आहेय. विजय आणि त्याच्या भावाने धोतीला मॅचिंग असं उपरणं घेतलं होतं. तर आईने ऑफव्हाइट रंगाची निळा काट असलेली साडी नेसली होती आणि वडिलांनी फिकट पांढऱ्या रंगाची धोती आणि उपरणं घेतलं होतं.
 
 
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये विजय आई, वडील आणि भावासोबत दिसत आहे. फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, 'तिचा आनंद... त्यांचा गर्व... आमचं नवीन घर... आम्हा चार देवरकोंडाकडून तुम्हाला खूप सारं प्रेम. आमच्या या प्रवासात तुमचीही साथ होती.' विजयच्या या फोटोनंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या.