दीपिकाने उघडले आलियाच्या लग्नाचे गुपित

    दिनांक :28-Nov-2019
|
मुंबई,
रणबीर कपूर-आलिया भट लग्न करणार असल्याची चर्चा आहे. हे खरं आहे की खोटं हे त्यांनाच ठाऊक. मात्र, खुद्द दीपिकाने हे गुपित आता उघड केले आहे. एका कार्यक्रमाला दीपिका पदुकोण आणि आलिया एकत्र आल्या होत्या. त्यावेळी आलिया देखील लवकरच लग्न करणार आहे' असे दीपिका बोलून गेली. त्यामुळे आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे.
 

 
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये विजयला, 'तुला कोणती बॉलिवूड अभिनेत्री आवडते'? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने पटकन दीपिका आणि आलियाचे नाव घेतले. मात्र, दीपिका लगेच म्हणाली की, 'माझं लग्न तर झालंय आणि आलियाचंही आता होणार आहे'. यावरून तिच्या लग्नाच्या बातमीला दीपिकानेच दुजोरा दिला आहे, असे म्हटलं जात आहे. दीपिकाने केलेल्या या वक्तव्यांमुळे आलिया आणि रणबीरच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.