अमिषा पटेलवर फसवणूकीचा आरोप

    दिनांक :29-Nov-2019
|
मुंबई,
बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल विरोधात इंदोरमधील न्यायालयात १० लाख रुपयांचा चेक बाउन्स झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुराव्यांच्या आधारे कोर्टाने अमीषा पटेल विरोधात नोटीस बजावली असून २७ जानेवारी रोजी तिला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. इंदूर येथील एका युवतीकडून सिनेप्रोडक्शनच्या नावाखाली तब्बल १० लाख रुपये घेतले होते. यानंतर अमिषाने तिला परत १० लाख रुपयाचा चेक दिला जो बाउन्स झाला.
 

 
चेक बाउन्स झाल्यावर त्या युवतीने अनेकदा अमिषाकडे पैसे मागितले, पण अमिषाने पैसे दिले नाही. अखेर युवतीने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अमिषाने दिलेला चेक बाउन्स होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिच्याविरोधात रांची कोर्टात तीन कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणी खटला सुरू असून अमिषाविरोधात अटक वॉरन्ट जारी करण्यात आला आहे.