रेड चित्रपटातील अभिनेत्रीचे निधन

    दिनांक :29-Nov-2019
|
मुंबई,
अभिनेत्री पुष्पा जोशी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांनी अभिनेता अजय देवगणच्या रेड चित्रपटात काम केले आहे. यात त्यांनी अभिनेता सौरभ शुक्लाच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडून भरघोस कौतुक करण्यात आले होते.
 

 
 
त्यांनी फेवीक्विकच्या जाहिरातीही काम केले होते. या जाहिरातीनंतर त्या स्वॅग वाली दादी म्हणून लोकप्रिय झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी पुष्पा त्यांच्या घरात पाय घसरून पडल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
 
 
 
रेड चित्रपटाचे दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी टि्‌वटरद्वारे या दु:खद घटनेची माहिती दिली आहे. राज कुमार गुप्ताने पुष्पा जोशी यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले, पुष्पा जोशी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला फार दु:ख झाले. माझ्या रेड चित्रपटात तुम्हाला भूमिका साकारताना पाहणे माझ्यासाठी फार महत्त्वाचे होते.