धक्कादायक! वाशीम जिल्ह्यात १०० किलो गांजा जप्त

    दिनांक :03-Nov-2019
25 लाख रुपये किंमतीचा 100 किलो 350 ग्रॅम गांजा जप्त
स्थागुशा वाशीमची अंमली पदार्था विरूद्ध धडक कारवाई
 
कारंजा लाड,
पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी वाशीम जिल्ह्याचा पदभार स्विकारल्यापासुन अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहिम हाती घेतली. त्याचाच एक भाग म्हणुन त्यांनी वाशीम जिल्ह्यात अंमली पदार्था विरोधी विशेष मोहिम हाती घेतली. या मोहीमे अंतर्गत केलेल्या कारवाईत लाखो रुपये किंमतीचा 100 किलो 350 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
 

 
 
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांना 2 नोव्हेंबर 2019 रोजी यांना गोपनीय बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, कारंजाकडुन शेलुबाजार कडे जाणार्‍या रोडने 10 ते 11 वाजताचे दरम्यान वाहन कमांक एम.एच.29 आर 7420 या कमांकाची लाल रंगाची आय 20 व एमएच 03 बिजे 7406 या क्रमांकाची ग्रे रंगाच्या इनोव्हा गाडी मधुन काही इसम गांजा हा अंमली पदार्थ घेवुन नागपूर कडुन पुण्याचे दिशेने जाणार आहेत. सदर माहितीच्या अनुषंगाने पोनि शिवा ठाकरे यांचे नेतृत्वात तिन वेगवेगळे पथक तयार करून कोळी फाट्याजवळ सापळा रचण्यात आला. रात्री 10 वाजेदरम्यान उपरोक्त वर्णनाचे संशयीत वाहने येत असल्याचे पाहुन त्यांना आडवुन शिताफीने थांबवुन दोन पंचा समक्ष त्यांच्या वाहनांची झडती घेतली असता दोन्ही वाहनामध्ये 100 किलो 350 ग्राम वजनाचा व 25 लाख 8 हजार 750 रूपये किमंतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला तसेच त्यांचे झडती मध्ये 9 मोबाईल फोन एक इनोव्हा कंपनीची गाडी, एफआय 20 कंपनीची गाडी व रोख रक्कम असा एकुण 18 हजार 19 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल असा एकुण 43 लाख 28 हजार 250 रूपये असा एकुण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
 
यामध्ये आशतोष गायकवाड, विजय शिंदे, प्रितेश शिंदे, दिनकर पवार, ज्ञानेश्‍वर शिंदे व महेश पराड यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन  कारंजा येथे अमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 व 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांचे अधिपत्याखाली अपर पोलिस अधिक्षक विजयकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि शिवाजी ठाकरे यांचे नेतृत्वात सपोनि अतुन मोहनकर, अजयकुमार वाढवे, पोउपनि भगवान पायघान, सपोउपनि भगवान गांवडे, पोना किशोर चिंचोळकर, पोना सुनिल पवार, पोना प्रशांत राजगुरू, राजेश राठोड, अमोल इंगोले, प्रेम आडे, राजेश गिरी, अश्‍वीनन जाधव, पोशि बालाजी बर्वे, पोशि संतोष सेनकुडे, पोशि प्रविण राऊत, मपोना तेहमिना शेख, व चालक सपो उपनिरी रमेश थोरवे, चालक पोना शाम इंगळे, चालक पोशि उस्मान यांचे पथकाने केली आहे.