मैदानातला चित्ता : माल्कम मार्शल

    दिनांक :03-Nov-2019
दीपक वानखेडे
 
जगाच्या पाठीवर असे काही लोकं आहे, जे त्यांच्या क्षेत्रातील स्टार आहे, किंवा होते. अशा लोकांचा आपला काही संबंध नसतो. ना त्यांची संस्कृती आपली राहते, ना ते आपले नातेवाईक राहतात... पण तरी कोणत्या तरी अँगलनी अशी काही माणसं आपल्याला आपली वाटतात. आणि सहजच त्यांच्या जीवनाविषयी आपण माहिती चाळत जातो. आपल्याला एक उत्सुकता राहते त्यांच्याप्रति कायम. 

 
 
वेस्ट इंडिजचा एके काळचा वेगवान गोलंदाज माल्कम मार्शल हा त्यातलाच एक आहे. 4 नोव्हेंबर 1999 रोजी कॅन्सरमुळे मार्शलनी वयाच्या 41 व्यावर्षी या जगाचा निरोप घेतला होता. उद्या त्याचा स्मृतिदिवस आहे.
 
 
वातारवण कुठलंही असो, देश कुठलाही असो भारत वा पाकिस्तान किंवा इंग्लंड माल्कम मार्शल चित्यासारखा धावत तिथल्या मैदानाव गोलंदाजी करून शिकार टिपत होता. फलंदाज त्याचा चेंडू समजण्याच्या पूर्वी हे सारं घडत होतं. वेस्ट इंडिजचा संघ जो कितीतरी वर्षे जगात क्रिकेटसाठी क्रमांक 1 चा संध राहिला, त्यात माल्कमचा मोलाचा वाटा होता. माल्कमच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याच्या गोलंदाजीशी जुळल्या अनेक घटनाही आहेत. त्याचे तेज तर्रार बाऊंसर अनेकांच्या डोक्याला छेदून गेले तर इंग्लंडचा तेव्हाचा खेळाडू माईक ग्याटिंगचं त्याच्या चेंडूनं नाक तोडलं होतं.
 
 
1983 साली भारताने वर्ल्ड कपमध्ये वेस्टइंडिजला हरल्यानंतर वेस्ट इंडिजची टीम भारतात मोठ्या आवेशानं आली होती. वेस्ट इंडिजचा वर्ल्ड कपमधला पराजय म्हणजे हा निव्वळ योगायोग होता, हे त्यांना जगाला दाखवून द्यायचे होते. वेस्ट इंडिजसोबत कसोटी सामने सुरू झाले. तेव्हा मार्शलची भूमिका महत्त्वाची झाली होती. सहा कसोटी सामन्यात 3-0 आणि 5 एकदिवसीय सामन्यात 5-0 ने वेस्ट इंडिज तेव्हा जिंकून मायदेशी परतला होता.
 
 
जगभरातल्या फलंदाजाकरिता एक दहशत होती माल्कमची. एकाग्रता, समर्पण आणि खेळ इन्जॉय करणं हे माल्कमच्या अंगी प्रमुख गुण होते. त्याच्या चांगल्या खेळाडू वृत्तीमुळे जगभरातील अनेक क्रिकेट स्टार त्याचे जवळचे मित्र होते. त्यानं क्रिकेेट स्वत:पुरत मर्यादित ठेवलं नाही तर इतर नवीन गोलंजदाजांनाही मोलाचं मार्गदर्शन केलं त्यात प्रामुख्याने साऊथ अफ्रिकेचा लान्स ग्लुजनर आणि शॉन पोलॉक यांचा समावेश आहे. वेस्ट इंडिज संघाचा तो कोचपण होता. हॅम्पशायर या घरेलू क्रिकेटसाठी मोलाचं योगदान देणार्‍या आणि जगभरातील वेगवान गोलंदाजात एक प्रमुख असणार्‍या माल्कमच्या पोटात 99 च्या वर्ल्ड कप नंतर अचानक वेदना होत होऊ लागल्या होत्या. निदानानंतर त्याला तीन वर्षांपासून कॅन्सर आहे, हे लक्षात आले.
 
 
136 एकदिवसीय सामन्यात 156 गडी बाद करणार्‍या आणि 81 कसोटी सामन्यात 376 विकेट्‌स, ज्यात 22 वेळा एका सामन्यात पाच गड्यांना बाद केले तर एकदा 22 धावा देऊन 7 गड्यांना बाद करण्याचा विक्रम करणार्‍या माल्कमच्या आजाराचे निदान झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात माल्कम या जगातून निघून गेला. त्याच्या समकालीन त्याचे क्रिकेटमधील मित्र आणि संपूर्ण क्रिकेट जगत त्याला आजही विसरू शकले नाही.
8766486542