बगदादी मेल्याच्या निमित्ताने...

    दिनांक :03-Nov-2019
विजय मनोहर तिवारी
98930 43200
 
अबु बक्र अल्‌ बगदादी, अमेरिकी सैन्याने घेरून मरण्याअगोदर, जीव वाचविण्यासाठी एका अंधार्‍या भुयारात लपला होता. परंतु, सैन्यासोबत आलेल्या प्रशिक्षित भयंकर कुत्र्यांनी त्याचा माग काढून पाठलाग केला, तेव्हा तो जिवाच्या आकांताने पळू लागला. खूप ओरडला, िंकचाळला. दयेची भीकही मागितली असावी, परंतु शस्त्रास्त्रांच्या गदारोळात त्याच्या अंतिम विनवण्या, त्याच्यासोबत मरण पावलेल्या तीन निरपराध मुलांशिवाय कुणी ऐकल्या नसतील. त्या मुलांनाही समजले नसेल की, अजून आयुष्य न जगलेले आपण वडिलांसोबत कुत्र्यासारखे का मारले जात आहोत ते. कदाचित त्यांना हेही माहीत नसावे की, इस्लामिक स्टेट ही काय बला आहे आणि आपल्या वडिलांनी अमानुषतेची कुठली आणि किती उदाहरणे जगासमोर ठेवली आहेत. कदाचित त्या तिघांपैकी एखाद्याला माहीत असेलही की, त्याचा अब्बा कुठल्या मार्गावर जात आहे आणि तो मार्ग शेवटी त्यांना कुठवर घेऊन आला आहे. 

 
 
बगदादीच्या परिचयात, त्याने घेतलेले शिक्षण लक्षात घेण्याजोगे आहे. त्याने एका इस्लामी विद्यापीठात इस्लाम विषयात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर पीएच. डी.देखील केली होती. म्हणजे तो तथाकथित मदरसाछाप शिक्षण पद्धतीत इस्लामची शिकवण घेऊन निघालेला झापडबंद तरुण नव्हता. जर त्याने इस्लामच्या नावावर सक्रिय दहशतवादात आपली कारकीर्द सुरू केली नसती, तर कदाचित तो कुठल्या तरी मुस्लिम देशात इस्लामी विद्यापीठात प्राध्यापक वगैरे झाला असता िंकवा इस्लामच्या नावावर भारतीय कॉर्पोरेट धर्मोपदेशक झाकिर नाईकप्रमाणे एखादे इस्लामी रिसर्च फाऊंडेशन स्थापन करून लक्षावधी डॉलर्सची कमाई करीत राहिला असता. झाकिर नाईक ते ओसामा तसेच बगदादीपर्यंत एक बाब समान आहे आणि ती म्हणजे- इस्लामची त्यांची स्वत:ची व्याख्या.
 
 
जगातील कोट्यवधी शांतिप्रिय मुसलमानांना, इस्लामला बदनाम केले जात आहे म्हणून अतिशय वेदना होत असतात. इस्लामला बदनाम करण्यात पश्चिमेकडील भांडवलशाही देशांची हातमिळवणी झाली आहे, हा संशय पसरविण्यात इस्लामचे तथाकथित समर्थक कुठलीच कसर सोडत नाहीत. भारतात हा आरोप काही प्रमाणात सांप्रदायिक म्हणविले जाणार्‍या िंहदू संघटनांवर लावण्यात येतो. परंतु, वस्तुस्थिती जगासमोर आरशाप्रमाणे स्पष्ट आहे. ओसामा, बगदादी, जवाहिरी ते हाफिझ सईद, मसूद अझहर, लखवीपर्यंतचे आमच्या काळातील लोकच इस्लामला बदनाम करणारे सर्वात मोठे गुन्हेगार आहेत. आपल्या विषारी प्रचाराने आणि रक्तरंजित कारवायांनी, या सर्वांनी हे निश्चितपणे सिद्ध केले आहे की, यांच्यापैकी कुणीही हयात असताना, दीड हजार वर्षे जुन्या एका रिलिजनचा गौरव वाढविणारे काहीही घडणार नाही. ते अशाच अपयशाचे निमित्त म्हणून ओळखले जातील.
 
 
बगदादीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर एक प्रतिक्रिया व्हायरल झाली- ‘‘बगदादीला मारण्यात आले, परंतु इस्लामी देशांमधून, ‘प्रत्येक घरातून बगदादी निघेल’, असल्या घोषणा आल्या नाहीत. याउलट, भारताच्या संसदेवरील हल्ल्याचा गुन्हेगार अफझलच्या फाशीनंतर दिल्लीत मात्र असे आवाज ऐकू आले होते.’’ कुठूनही येवोत, हे आवाजच इस्लामच्या अपयशाचे मूळ कारण आहे. बगदादीने स्वत:ला खलिफा घोषित केले होते. मोसुलच्या एका मशिदीत काळ्या कपड्यांमध्ये त्याला शेवटचे बघितले गेले. त्यानंतर एक लहरच निर्माण झाली होती आणि भारतातल्या केरळपासून काश्मीरपर्यंत, एवढेच नाही, तर पश्चिमेच्या देशांमधीलही चांगले शिकले-सवरले तरुण इस्लामिक स्टेटकडे आकर्षित झाले होते. इस्लामिक स्टेटने शरिया कायद्यानुसार खूप जोरात सुरवात केली होती. सीरिया आणि इराकहून प्रचारित झालेल्या त्यांच्या अमानुष व्हिडीओंना बघून जगाचा थरकाप उडाला होता. काफिरांना दंडित करण्यासाठी असे मध्य युगात आढळणारे प्रकार उपयोगात आणले गेले होते, इस्लामच्या नावावर पसरविण्यात आलेल्या या दहशतवादाचा भारताहून अधिक भुक्तभोगी जगाच्या इतिहासात कुणी नसेल.
 
 
तुम्ही जर गूगलवर अबु बक्र नावाचा शोध घेतला तर काही िंलक तुम्हाला इस्लामच्या आधी, खलिफाच्या (जे पैंगबरानंतर दोन वर्षे खलिफा म्हणजे त्यांचे उत्तराधिकारी राहिले होते) परिचयापर्यंत पोहचवतील. कदाचित इस्लामचे उच्च शिक्षण घेताना बगदादी नावाच्या अबु बक्रच्या मनातही खलिफा बनण्याचे स्वप्न चमकले असावे. शंभर वर्षांपूर्वी शेवटच्या खलिफाला तुर्कीहून कमाल मुस्तफा पाशाने बेदखल करून टाकले होते. तुर्कीहून खलिफा पळाल्यानंतर कमाल पाशा यांनी आपल्या इस्लामी देशाचा चेहराच बदलून टाकला होता. हा देश नंतर एक आधुनिक तसेच साफ-स्वच्छ ओळख घेऊन जगासमोर आला. पाशाने आपल्या वेगवान सुधारणांमुळे सर्व प्रकारच्या रिलिजिअस ओळखींवर बंदी घातली. नव्या मशिदींच्या निर्माणावर बंदी घातली, तसेच जुन्या मशिदी, ज्या इस्लामच्या आगमनापूर्वी चर्च होत्या, त्यांचे संग्रहालयात रूपांतर करून टाकले. पाशाने शुक्रवारची आठवडी सुटी रविवारी केली.
 
 
पाशाने तुर्की भाषेचे शुद्धीकरण करून आठशे वर्षांच्या अरबी मिश्रणाला, डाळीतील खड्यांप्रमाणे वेचून वेगळे केले. यासाठी ते, मूळ तुर्की भाषा शिकविण्यासाठी मुलांमध्ये खडू-फळा घेऊन स्वत: जात असत. त्यांनी कुराणाचाही अनुवाद करवून घेतला आणि अरबीच्या ऐवजी तुर्की भाषेत कुराणाच्या शिक्षणाची परंपरा सुरू केली. आतापर्यंतच्या सुधारणांवर शेपटी घालून बसलेले मौलवी, तुर्की भाषेतील कुराणाच्या शिक्षणावर मात्र अत्यंत संतप्त झाले. त्यांच्या क्रोधाचा पारा आकाशात पोहचला. कट्‌टरपंथींनी म्हटले, हे आता अती झाले. कुराण तर अरबी भाषेतच शिकवले जाईल. पाशा यांचा युक्तिवाद होता- हा कुठला अल्ला आहे, जो एखादी गोष्ट अरबीत समजावून सांगेल पण तुर्कीत नाही? त्याने ठामपणे सांगितले की, आम्ही इस्लामचे अनुयायी आहोत, परंतु इस्लामच्या आधी आम्ही तुर्की आहोत. आमची एक प्राचीन भाषा आहे. तुर्की संस्कृती इस्लामपेक्षाही प्राचीन आहे. आमचे सामाजिक रीतिरिवाज आहेत. आम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नाही आणि त्यांचे अनुसरण करूनही आम्ही इस्लामहून वेगळे नाहीत. केवळ 15 वर्षांमध्ये कमाल पाशा यांनी तुर्की देशात इस्लामचे एक आधुनिक स्वरूप प्रस्थापित केले. 1400 वर्षांच्या इस्लामच्या इतिहासात अशा साहसी आमूलचूल बदलाचे दुसरे उदाहरण नाही.
 
  
कमाल पाशा यांनी शेवटचा श्वास घेतला तेव्हा तुर्कीच्या कृतज्ञ नागरिकांनी त्यांना आपला ‘अतातुर्क’ म्हटले. अतातुर्क म्हणजे राष्ट्रपिता. आणि जेव्हा तुर्कीच्या या अतातुर्कने आपल्या देशातून खलिफाच्या रूढिवादी आणि कट्‌टर बंधनांना समाप्त केले, तेव्हा भारतात आमचे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी खिलाफत आंदोलन सुरू केले होते. आजच्या अधिकांश कॉंग्रेसींनाही खिलाफत आंदोलनाची पृष्ठभूमी माहीत नसेल आणि बापूंच्या दुसर्‍या आंदोलनाप्रमाणे यालादेखील ते स्वातंत्र्यलढ्याचे एक आंदोलन समजत असतील. बापूंनी तुर्कीत खलिफा पद समाप्त करणे आणि तत्कालीन खलिफाला तुर्कीतून बेदखल करण्याच्या विरुद्ध भारतात हे आंदोलन सुरू केले होते. म्हणजे ते उघडपणे खलिफाच्या समर्थनार्थ उभे झाले होते. जगातील कुठल्याही इस्लामी देशामध्ये रस्त्यांवर असे दृश्य नव्हते, जे कॉंग्रेसच्या नेतृत्वात भारतात बघायला मिळाले. खलिफाच्या बेदखलीने कॉंग्रेसला या आंदोलनासाठी प्रेरित केले. कॉंग्रेसचा हा निर्लज्ज प्रयत्न केवळ भारतीय मुसलमानांना खुश करण्यासाठी होता. पाऊस इस्तंबुलमध्ये पडत होता आणि बापूंनी छत्री इथे-भारतात उघडली होती.
 
 
मी बरेचदा विचार करतो की, आमच्या अतातुर्ककडे भारतीय मुसलमानांच्या भल्यासाठी दुसरी एखादी भविष्याची दृष्टी का नसावी? जो पक्ष स्वत: स्वातंत्र्याच्या लढ्यात गुंतला आहे, तो दूरवरच्या एका देशात खलिफा पद रद्द करण्याच्या, अत्यंत अंतर्गत मामल्यात रस्त्यांवर उतरला होता, हे किती हास्यास्पद आहे, नाही! गंमत म्हणजे, भारतीय मुसलमानांना ना तुर्कीशी काही देणेघेणे होते ना खलिफाच्या राजवटीशी. तो खलिफा भारताच्या मुसलमानांच्या दैनंदिन जीवनात कुठे, कोणत्या भूमिकेतच नव्हता. त्याचे नावदेखील कुणा मुसलमानाला माहीत नव्हते. आजदेखील कुणाला माहीत नसेल. परंतु, कॉंग्रेसच्या या पुढाकाराने एक अतिशय चुकीचा पायंडा पडला. स्वातंत्र्यानंतर आता मुस्लिम समाजाच्या भल्यासाठी या पक्षाला कुठल्या व्यापक दृष्टीची गरज राहिली नव्हती. समर्थन प्राप्त करण्यासाठी, मुसलमानांना तात्कालिक गोष्टींवर खुश करा आणि सत्तेत कायम राहा, एवढेच पुरेसे होते. तुष्टीकरणाच्या या निकृष्ट सूत्रावर कॉंग्रेस साठ वर्षांपर्यंत देशावर राज्य करीत राहिली.
 
 
काही राज्यांत, खुश करण्याच्या याच अल्पसंख्यक राजकारणाने दुसर्‍या सेक्युलर पक्षांनाही सत्तेची चव घेण्यास मदत केली. काश्मीरचे घावदेखील याचमुळे आतापर्यंत हिरवे राहिलेत. कारण, काही भव्य करून दाखविण्याची कुणाचकडे ना धमक नव्हती, ना नियत होती. निवडणुकीच्या गणितात मामला, कसाबसा का होईना, फिट बसला की झाले! या परंपरागत सेक्युलरवादी राजकारणात, मुसलमान समाजाला जसे आहे तसेच राहू देण्यात जोखीम आहे, असे फक्त काही नेत्यांना वाटत होते. पी. व्ही. नरिंसह राव यांचे एक वक्तव्य नुकतेच खूप चर्चेत आले होते. शाहबानो प्रकरणाच्या वेळी राजीव गांधी सरकारच्या एका नाराज बुद्धिवान मुसलमान मंत्र्याला त्यांनी म्हटले होते की, आम्ही राजकीय नेते आहोत, समाजसुधारक नाही. कुणाला खड्‌ड्यातच पडून राहायचे असेल तर आम्ही काय करू शकतो? (तसेही, राहुल गांधींना शक्य असेल, तर बगदादीच्या मृत्यूनंतर भारतात एक आणखी खिलाफत आंदोलन सुरू करण्याचा ते प्रयत्न करू शकतात. अफजलच्या समर्थनार्थ निघालेले आवाज, त्यांच्या ऊर्जावान नेतृत्वाची प्रतीक्षा करत असण्याची शक्यता असू शकते आणि निर्जीव झालेल्या कम्युनिस्ट आणि इतर कट्‌टर सेक्युलर प्रादेशिक पक्षांच्या मदतीने हे आंदोलन पुन्हा एकदा, राख झालेल्या कॉंग्रेसला त्याच्या जुन्या ढंगाच्या राजकीय फॉर्म्युल्याला बळ देण्यात यशस्वी होईल- तुष्टीकरणाचे राजकारण, खुश करा आणि व्होट घ्या.)
 
 
आता भारतीय मुसलमानांच्याही लक्षात आले आहे की, ते ज्याला स्वत:चा मानून साठ वर्षांपासून एका रेषेवर चालत होते, तो आत्मघाती विश्वासच होता, ज्याचे मतांच्या राजकारणात फक्त दोहनच करण्यात आले. त्यांना इतर समाजापासून वेगळे पाडण्यात आले. शिक्षण, स्वास्थ्य, रोजगार इत्यादी क्षेत्रात ते काठावरच राहिले. सेक्युलर कारस्थानाने तर त्यांचे याहूनही अधिक नुकसान केले आहे. या कारस्थानामुळे कट्‌टरपंथ आणि फुटीरता पसरविण्याला भरपूर खतपाणी मिळाले आहे. या हातमिळवणीने काही मुस्लिम नेते आणि फुटीरतावाद्यांची घराणी तर खूप फळली-फुलली; परंतु एका फार मोठ्या लोकसंख्येला दुय्यम दर्जाच्या स्तरावरून वर उठूच दिले गेले नाही. एक विनाकारण बदनाम वारसाच त्यांच्या पदराचा कलंक होऊन समोर आला.
 
 
ओसामा िंकवा बगदादीचा उदय अथवा त्याच्या मरणावर कुठल्या जमातीकडून कुठलाच आवाज आला नाही. तो इस्लामच्या बदनामीला जबाबदार असलेला एक गुन्हेगार होता, ज्याने यझदी महिलांना जाहीरपणे गुलाम बनविले, त्यांच्यावर बलात्कार केले आणि निरपराध लोकांना बंदी बनवून त्यांना यमयातना देत ठार केले. एवढेच नाही, तर जगातील शांतिप्रिय लोकांना धमकविण्यासाठी या बीभत्स हत्यांचे व्हिडीओ बनवून प्रचारितही केले. हा इस्लामचा चेहरा नाही, हे सांगायला बापूंच्या खिलाफत आंदोलनाप्रमाणे कुणीही रस्त्यांवर उतरले नाही. बगदादी आमचा खलिफा होऊच शकत नाही. तो गुन्हेगार होता, असेही कुणी म्हटल्याचे स्मरत नाही. हत्या, लूट आणि बलात्काराहून त्याचा मोठा गुन्हा हा होता की, तो हे सर्व इस्लामच्या नावावर करत होता. तरीही कुणी त्याच्याविरुद्ध आवाज काढला नाही. कुण्या जिलानी, गिलानी, ओवैसी, आझम, आझमी यांनी एकटे िंकवा एकत्र येऊन असे म्हटले नाही. हां, काश्मीरच्या कलम 370 िंकवा अयोध्येतील रामजन्मभूमीबाबत मात्र या लोकांना प्रत्येक मंचावर विषवमन करण्यासाठी भरपूर वेळ होता. तसेही या राजकीय जंतूंपासून काही अपेक्षा करणेच व्यर्थ आहे. राजकीय स्वार्थ साधता आला पाहिजे, मग जनता चुलीत गेली तरी हरकत नाही, एवढेच त्यांच्या रिलिजिअस भूमिकेसाठी पुरेसे आहे.
 
 
यासाठी सेक्युलर पक्ष िंकवा कठमुल्लेच जबाबदार आहेत का? हा खरा प्रश्न आहे. इस्लामी जगातील विख्यात विद्वान मौलाना वहीदुद्दीन यांनी, मुस्लिम समाजासाठी जाहीर होणार्‍या आकर्षक सरकारी धोरणांबाबत एकदा म्हटले होते की, राजकीय पक्षांची आश्वासने िंकवा सरकारी मदत काही लोकांनाच लाभान्वित करू शकते, परंतु कुठल्याही समाजात मोठी सुधारणा अथवा बदल घडवून आणू शकत नाही. कुठल्याही समाजाला स्वत:ला बदलविण्याची सुरवात स्वत:च करावी लागते. त्याला सर्व प्रकारची धूळ झाडून स्वत:च उभे राहण्याची गरज असते. देश-विदेशात इस्लामच्या बदनामीला खरे जबाबदार कोण आहेत आणि त्यांच्यापासून सुटका कशी करायची, याचा भारतातील शांतिप्रिय असलेल्या बहुसंख्य मुसलमानांनी, बगदादीच्या कुत्र्यासारख्या मृत्यूच्या निमित्ताने का होईना, पण विचार करण्याची वेळ आली आहे, असे वाटते.