महाराष्ट्राचे हित पाहता लवकरच सरकार स्थापना होणार -मुख्यमंत्री

    दिनांक :03-Nov-2019
अकोला, 
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. सर्वत्र ओला दूष्काळ आहे. अशा वेळी काळजीवाहू सरकारला धोरणात्मक निर्णय घेताना काही अडचणी असतात. पण, सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी असून नवीन सरकार स्थापण्याचा पेच लवकर सुटेल तसेच महाराष्ट्राचे हित पाहता लवकरच सरकार स्थापन होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री अकोल्यात आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
 
 
 
मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचे आहे. महाराष्ट्रात आता शेतकर्‍यांवर मोठे संकट आहे. नवीन सरकार स्थापन करण्याची गरज आहे. महाराष्ट्राचे हित पाहता लवकरात लवकर सरकार स्थापन होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सरकार स्थापनेचा पेच लवकर सुटेल. सगळ्यांना महाराष्ट्राच्या हितासाठी काम करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.