वस्तीत मगर आढळल्याने दहशत

    दिनांक :03-Nov-2019
चामोर्शी,
शहरालगत मार्कंड मोहल्याला लागून तलाव आहे. त्या तलावात काल दुपारच्या वेळेस एक  मगर तलावाच्या पाळीवर असलेल्या हनुमान मंदिर परिसरात लोकांना आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी वनविभागाने लक्ष घालून मगाराचा बदोस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. याच तलावात कपडे धुण्यासाठी दोन ते तीन घाट बांधण्यात आले असून सकाळपासून तलावात कपडे धुण्यासाठी महिलांची गर्दी असते. तलाव शहराच्या मध्यभागी असल्याने याच तलावात गौरी, गणपती, शारदा, दुर्गाचे विसर्जन केल्या जाते त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.