वृत्तपत्रांनी वैचारिक बांधिलकी जपावी : नितीन गडकरी

    दिनांक :03-Nov-2019
दिवाळी स्नेहमिलनानिमित्त तरुण भारतला सदिच्छा भेट
 
नागपूर, 
वृत्तपत्रांनी सामाजिक व वैचारिक बांधिलकी जपली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. दै. तरुण भारतच्यावतीने एमआयडीसी कार्यालयात आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात सहभागी झाले असता ते बोलत होते.
याप्रसंगी श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे अध्यक्षस्थानी होते. प्रबंध संचालक धनंजय बापट, संचालक व संस्थेचे माजी अध्यक्ष उदयभास्कर नायर, संचालक अशोक मानकर, समीर गौतम, आशीष बडगे, मीरा कडबे व धनंजय वेलणकर हे याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 

 
याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, वृत्तपत्राच्या दृष्टीने विश्वासार्हता महत्त्वाची असून तरुण भारतने ही विश्वासार्हता जपली आहे. तरुण भारत हे वैचारिक कटिबद्धता ठेवणारे, राष्ट्रीय विचारांपासून प्रेरणा घेऊन लोकांचे प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार करणारे वृत्तपत्र आहे. आपल्या समायोजित भाषणात गडकरी यांनी तरुण भारतच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीला डॉ. विलास डांगरे यांनी संस्थेच्या वतीने तर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुहीकर यांनी कर्मचार्‍यांच्या वतीने नितीन गडकरी यांचे स्वागत केले. मुख्य संपादक गजानन निमदेव यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. त्याआधी झालेल्या इतर पुरस्कार वितरण समारंभाचे संचालन उदय भांगे व प्रगती किडे यांनी केले. महाव्यवस्थापक देवेंद्र टोणपे यांनी शेवटी आभार मानले. दोन सत्रांत झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला उत्कृष्ट कार्य करणार्‍या कर्मचार्‍यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, तर दुसर्‍या सत्रात नितीन गडकरी यांच्या हस्ते तरुण भारताच्या ज्येष्ठ तालुका प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
 
ज्येष्ठ तालुका प्रतिनिधींचा सन्मान
गेल्या 20 वर्षांपासून सेवा देत असलेल्या तरुण भारतच्या तालुका प्रतिनिधींचा याप्रसंगी नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डोणगावचे जीवनिंसह दिनोरे, कारंजाचे आप्पा महाजन, जानेफळचे मनीष मांडवगडे, धामणगावचे कमल छांगाणी, अंजनगावसूर्जीचे अनिल जिंतूरकर, धारणीचे रवींद्र नवलाखे, दारव्हा येथील सतीश पापळकर, वणीचे गजानन कासावार, वरोडाचे श्याम ठेंगडी, ब्रह्मपुरीचे दिलीप शिनखेडे, कुरखेडाचे बंडू लांजेवार, सानगडीचे मनोहर लोथे, तिरोडा येथील मुकेश अग्रवाल, आमगावचे झामलाल बोरकर, अर्जुनी मोरगावचे सुरेंद्र ठवरे, उमरेडचे अरिंवद हजारे, भिवापूरचे सदाशिव नान्हे, कुहीचे सुधीर भगत, खापरखेडाचे दिवाकर घेर व नरखेडचे लहुजी वैद्य या तालुका प्रतिनिधींना शाल-स्मृतिचिन्ह देऊन गडकरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 
विशेष पुरस्काराचे मानकरी
याप्रसंगी प्रबंध संचालक धनंजय बापट यांच्यावतीने विविध विभागांत विशेषात्वाने कार्य करून आपल्या कामाची छाप पाडणारे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी संजय रामगिरवार, जाहिरात व्यवस्थापक विवेक तरासे, महाव्यवस्थापक देवेंद्र टोणपे, सहाय्यक वृत्त संपादक श्रीनिवास वैद्य, प्रशासकीय विभागाचे उदय भांगे व प्रगती किडे, छपाई विभागाचे मोहब्बतिंसग उर्फ मन्नू बावा, डीटीपी मंगेश कल्याणकर, लेखा विभागाचे प्रसन्न देशमुख, वेब पोर्टलचे नितीश गाडगे यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
 
पुरस्काराचे मानकरी (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ)
- संपादक विभाग : सुनील काथोटे, आनंद मोहरील, अरिंवद मराठे, मििंलद महाजन.
- वृत्तसंकलन : निखिल केळापुरे, प्रवीण वानखेडे, निखिल जनबंधू, हेमंत सालोडकर.
- विभाग प्रमुख : नीरज दुबे, पराग जोशी, उमाशंकर लाल, संदीप गाडगे.
- विपणन विभाग : कृष्णकांत नवघरे, पंकज गणोरकर, योगेश काटे, आदित्य गुंडे.
- छपाई विभाग : विनोद चंद्रवंशी, विनायक दिवटे, इकबालिंसह थेट्टी, देवीदास मोहतुरे.
- प्री प्रेस विभाग : आशुतोष इनामदार, दीपक वानखेडे, नीलेश मारवाडे, कैलास बोरकर.
- डीटीपी विभाग : अतुल शिवणकर, सुरेश बेले, मयुरेश इनामदार, विलास खटी.
- प्रशासन-लेखा विभाग : ललित शेंडे, प्रसाद पाठक, हरिहर ढोमणे, दिनेश बोरकर.
- वितरण विभाग : राहुल जोशी, कैलास खांदेभराड, अशोक सपाटे, वैशाली खराबे.
- पार्सिंलग विभाग : लिलाधर खंडाते, उदय जुगादे, प्रशांत कुकडे, संजय जोगे.
- अॅडमिन हाऊसकििंपग : सुरेश सोमकुंवर, यशवंत डाहाके, सुनील केदार, गोपीचंद आंबोणे.
- जिल्हा प्रतिनिधी : प्रफुल्ल व्यास (वर्धा), नंदकिशोर काथवटे (गडचिरोली), चंद्रकांत लोहाणा (वाशीम), गिरीश शेरेकर (अमरावती)
- तालुका प्रतिनिधी : दौलत धोटे (आरमोरी), प्रमोद बोराटणे (पुलगाव), अरुण कराळे (वाडी).
- जिल्हास्थानावरील सहाय्यक : अमित गिरीपुंजे (भंडारा), मोनिष चौबे (अकोला), मनोज राऊत (अमरावती), गजानन उपलेंचवार (यवतमाळ).