कर्जबाजारी आणि नापिकीमुळे शेतकर्‍याची आत्महत्या

    दिनांक :03-Nov-2019
 
 
 
चंद्रपूर, 
कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे 42 वर्षीय शेतकर्‍याने किटकनाशक प्राशन करून रविवारी आत्महत्या केली. देविदास सहादेव राऊत असे मृत शेतकर्‍याचे नाव असून, तो ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव बुज येथील रहिवासी आहे.
हाताशी आलेले पीक अवकाळी पावसाने हिरावले. यंदाच्या खरीपात 4 एकर शेतातून अवघी दहा पोते धानाचे उत्पन्न झाले. त्यामुळे देविदास खचून गेला. या नैराश्यातून त्याने रविवारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. मृतक शेतकर्‍यावर बँकेचे दोन लाख व उसनवारी घेतलेले दोन लाख असे एकूण चार लाख कर्ज असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. शेतीतून उत्पन्नच न झाल्याने कर्जाची परतफेड व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत सापडलेल्या देविदास आपली जीवनयात्रा संपवली. मृतकाच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.