धक्कादायक! पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार

    दिनांक :03-Nov-2019
झोपडी लगतच्या इसमाने केले कृत्य
हिंगणघाट,
येथील शीतला माता मंदिर परिसरातील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या पाच वर्षीय बालिकेवर लगतच राहणाऱ्या ओळखीच्या २८ वर्ष इसमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी महिलेचा पती हिंगणघाटच्या ढोकपांडे यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला आहे. त्याच्यासोबतच आरोपीचा भाऊ दिलीप सुद्धा कामाला आहे. दिलीपच्या ओळखीतून त्याचा भाऊ आरोपी दीपक गेडाम याचे फिर्यादीशी व घरगुती संबंध आहे. या संबंधाचा फायदा घेत आरोपी दीपक हा फिर्यादीच्या मुलीला घेऊन नेहमी फिरायला जायचा. आजही दुपारी दीड वाजताच्या दरम्यान आरोपी त्या बालिकेला घरून घेऊन गेला. व दीड तासाने तिला घरी आणले व घराजवळ सोडून दिले. त्यानंतर लगतच राहणारा आरोपी त्वरित घरी गेला. व आपला पॅन्ट बदलून घाईतच बाहेर निघून गेला. ही बाब पीडित बालिकेच्या आईच्या निदर्शनात आली तिने मुलीला विचारणा करून तिच्या अंतर्वस्त्रांची पाहणी केली असता रक्ताळलेले दिसले. त्यामुळे तिच्या आईने मुलीची विचारपूस करून हिंगणघाट पोलिसात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल दाखल केली याप्रकरणी पोलिसांनी भादवि ३७६ व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी दीपक गेडाम यास ताब्यात घेतले आहे.