‘या’ अभिनेत्यासोबत आर्चीला जायचे आहे डेटवर

    दिनांक :03-Nov-2019
‘सैराट’ चित्रपटातील अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगूरु हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनावर राज्य केले आहे.  रिंकूच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते फार उत्सुक असतात. रिंकू कोणाला डेट करते? रिंकू सिंगल आहे की रिलेशनशीपमध्ये आहे अशा अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. मात्र एरवी याबद्दल बोलणे टाळणाऱ्या रिंकूने तिला कोणत्या अभिनेत्याला डेट करायला आवडेल याचा खुलासा केला आहे.
 
 
काही दिवसांपूर्वी रिंकूने कलर्स टीव्हीवरील ‘एकदम कडक’ या शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामधील ‘तुला कोणासोबत डेटवर जायला आवडेल?’ या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावर आर्चीने एक दिवस तिला अभिनेता विकी कौशलसोबत डेटवर जायला आवडेल असे उत्तर दिले आहे.