'दुर्गावती' सिनेमात भूमी पेडणेकर 'हिरो'

    दिनांक :30-Nov-2019
|
मुंबई,
अभिनेता अक्षय कुमारची गाडी सध्या फॉर्मात आहे. केसरी, मिशन मंगल, हाऊसफुल्ल अशा एकापेक्षा एक हिट चित्रपटांनतर तो आणखी सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षयनं 'दुर्गावती' या नव्या सिनेमाची घोषणा केली असून इन्स्टाग्रामवर चित्रपटाचं पोस्टरही त्यानं लाँच केलं आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

 
अक्षय कुमारनं चित्रपटाचं हटके पोस्टर लाँच केलं आहे. या फोटोत अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक हातात पाटी घेऊन उभे आहेत.
 
 
 
विशेष म्हणजे, पोस्टरमध्ये भूमी पेडणेकरचा उल्लेख 'हिरो' म्हणून केला आहे. त्यामुळं प्रेक्षकांची चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. 'दुर्गावती' चित्रपटाचे दिग्दर्शन जी. अशोक असून निर्माते भूषण कुमार आहेत. पोस्टरमध्ये अक्षय कुमारच्या हातात 'प्रेझेंटर' अशी पाटी आहे. त्यामुळं चित्रपटात तो कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.