नेहा पेंडसे अडकणार विवाहबंधनात

    दिनांक :30-Nov-2019
|
मुंबई,
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नेहा तिचा प्रियकर शार्दुल सिंहसोबत पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये लग्न करणार आहे. बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत नेहाने तिच्या लग्नाची तारीख सांगितली. येत्या ५ जानेवारीला नेहा आणि शार्दुल लग्न करणार आहेत.
 
 
पुण्यात अगदी जवळच्या मित्र- परिवारामध्येच नेहा आणि शार्दुल लग्न करणार असल्याचं तिने स्पष्ट केलं. याआधी दिलेल्या मुलाखतीत नेहाने स्पष्ट सांगितलं होतं की लग्नातल्या महत्त्वपूर्ण विधींवेळी साडी नेसण्याला प्राधान्य देणार आहे.
लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडायचं की जवळच्या लोकांमध्येच पार पाडायचे हे ठरलं नव्हतं. पण अखेर शार्दुल आणि नेहाने अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याला पसंती दिली. याशिवाय नेहाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक मराठी, तेलगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं आहे.
बॉलिवूडमध्येही तिने प्यार कोई खेल नहीं, दागः द फायर, दीवाने यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. नेहाने कॅप्टन हाउसमधून बालकलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. याशिवाय तिने पडोसन, मीठी मीठी बातें, मे आय कम इन मॅडम यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं. बिग बॉसमधून नेहाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली.