शाहरुख दिसणार 'ब्रह्मास्त्र'मध्ये ?

    दिनांक :04-Nov-2019
आयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमात आलिया-रणबीरसोबत शाहरूख खानही दिसणार आहे, अशी चर्चा आहे. याबद्दल अधिकृत घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही. शाहरूख त्याच्या वाढदिवशी याबद्दल अधिकृत घोषणा करेल, असे म्हंटल्या  जात होते  पण तसं काहीच झालं नाही. शाहरूखचा 'झिरो' सिनेमा बॉक्स ऑफिसवर आदळला होता. त्यानंतर सिनेमातून शाहरूखनं काही काळ विश्रांती घेण्याचं ठरवलं होतं. आता आयान मुखर्जीच्या आगामी सिनेमात शाहरुख लहानशा भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जातंय.
 
 
 
'मुंबई मिरर'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'शाहरुखला या चित्रपटात एका लहानशा भूमिकेसाठी विचारण्यात आले. शाहरुखला आयान मुखर्जीचे काम आवडत असल्याने त्यानंही लगेच होकार कळवला. चित्रपटात शाहरुखची भूमिका छोटी असली तरी कथेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. शाहरुखच्या भूमिकेमुळे चित्रपटातील रणबीरच्या पात्राचा प्रवास एका महत्त्वपूर्ण वळणावर पोहोचताना दिसणार आहे. शाहरुखने चित्रीकरणासाठी तारखा ठरवल्या असून डिसेंबरमध्ये या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.'