लालनाला प्रकल्पात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृत्यूदेह

    दिनांक :04-Nov-2019
गिरड,
परीसरात येत असलेल्या कोरा येथिल लालनाला प्रकल्पात आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यूदेह तलावातील पाण्यात तंरगतानी आढळल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. या अज्ञात व्यक्तीचे वयवर्ष ३० ते ३५ असे आहे. 
 
 
प्राप्त माहितीनुसार ४ नोव्हेंबरला सकाळी काही नागरिक सकाळी व्यायामाकरिता कोरा येथिल लालनाला प्रकल्पाच्या पातळीवरून जात असताना त्यांना तलावाच्या पाळी जवळ एक ३० ते ३५ वर्ष वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृत्यूदेह पाण्यावर तरंगतानी आढळला. हि माहिती कोरा गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली.
 
 
तलावाच्या पाळीवर मुत्यदेहापासुन २०० मिटिर अंतरावर एक पाकीट आढळले असून त्यात ९५० रुपये व एक मंगरुळ कोरा बसची रविवार दुपारी ३.३० वाजता दरम्यानची तिकीट आढळून आली. हा व्यक्ती कोण आहे, तो कुठून आला व त्याच्या मुत्यूचे नेमक कारण काय आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती गिरड पोलिसांना देण्यात आली असून प्रकरणाचा पुडे तपास पोलिसांनी सुरु केला आहे.