कार्य : पायाभूत स्तरावर बरेच काही...!

    दिनांक :04-Nov-2019
विजय सरोदे
 
 
भारताने पायाभूत स्तरावर (इन्फ्रास्ट्रक्चर) बरेच काही करूनही अनेक समस्या कायमच राहिलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) म्हणण्यानुसार बँकिंग यंत्रणा मजबूत करण्यासाठी केंद्राच्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे. विशेषकरून बिगर बँकिंग क्षेत्रात सुधारणांची नितांत आवश्यकता आहे. अर्थव्यवस्थेतील सुस्ती दूर करण्याचे दृष्टीने सरकारने 10 मोठ्या बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा केली आहे. सरकार ने 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठीच ही कार्यवाही केली आहे.
 
 
आयएमएफने 2019 या वर्षासाठी 6.1 टक्के वाढदर राहणार असल्याचे अनुमान काढले आहे. मात्र आशाही व्यक्त केली आहे, की- 2020 मध्ये यात सुधारणा होईल. त्यावेळी आर्थिक वाढीचा दर 7 टक्के राहू शकतो. याआधीच्या अंदाजापेक्षा हा दर 120 बेसिस पॉईंट्सने कमी आहे. 100 बेसिस पॉईंट म्हणजे एक शेकडेवारीच्या भाषेत एक टक्का होत असतो. 

 
 
भारतात अनेक प्रतिभाशाली महिला असूनही त्या चार भिंतींच्या आडच राहत असल्याची खंत व्यक्त करीत आयएमएफने श्रम शक्तीमध्ये महिलांची भागीदारी वाढ़विण्यावर जोरही दिला आहे.
 
 
दिवांळीच्या सुट्टीत गुजरात, महाराष्ट्र आणि बंगाल यासारख्या राज्यातील लोक देशविदेशात प्रवासासाठी जात असतात. पण यावर्षी आर्थिक मंदीचा प्रभाव दिसून येत असून गुजरातमधून बाहेर राज्यात फिरण्यासाठी जाणार्‍यांच्या संख्येत 25 टक्के घट झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टांची वाट पाहत असलेले गुजरातचे ट्रॅव्हल्स व टूर ऑपरेटर्स यंदा निराश झाले होते. सामान्यत: याच काळात त्यांच्याकडे गाड्याची तिकिटे बुक करण्यासाठी मोठी गर्दी राहत असते.
 
 
पण यावेळच्या बुकिंगमध्ये 25 टक्के घट झालेली होती. त्यांच्या मते देशभरात पसरलेल्या मंदीचा हा थेट परिणाम होय. गुजराती लोक दिवाळीच्या सुटीत दूरवरच्या प्रवासासाठी निघतात तेव्हा किमान 10 से 15 दिवसांची योजना असते. ते तुर्कस्तान, सिंगापूर, थायलंड, दुबई तसेच देशांतर्गत काश्मीर केरळ, अंदमान यासारख्या सुदूर क्षेत्रांपर्यंत जात असतात. पण यावेळी प्रवास तर अगदी कमी अंतराचे झाले असून विदेशांऐवजी देशातील ठिकाणांवर जास्त भर दिला जात आहे. गुजराथी लोकांच्या पसंतीची जागा असलेल्या काश्मिरातही गेल्या दोन ते तीन हंगामापासून गुजरातेतील मोजकेच प्रवासी गेलेले आहेत.
 
 
•