म्हणून सोनाक्षी सिन्हा इंडिगोवर संतापली

    दिनांक :04-Nov-2019
 
 
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने ट्विट केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सोनाक्षी ‘इंडिगो एअरलाइन्स’वर टीका करताना दिसत आहे. सोनाक्षी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. अलिकडेच तिने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या सामानाचे नुकसान केले असा आरोप तिने या व्हिडीओमार्फत केला आहे.
 
 
 
 
“आज मी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून प्रवास केला. प्रवासाआधी माझी बॅग सुस्थितीत होती. परंतु प्रवास पूर्ण झाल्यानंतर बॅग तुटलेल्या अवस्थेत मला मिळाली. माझी बॅग तोडल्याबद्दल धन्यवाद” असे म्हणत तिने या एअरलाइन्सबाबत आपला राग व्यक्त केला आहे. परंतु त्यानंतर लगेचच इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी देखील ट्विट करुन तिची माफी मागितली. आता हे सर्व प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. आतापर्यंत काही तासात सहा हजार पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांचे अनुभव ट्विट करुन इंडिगो एअरलाइन्सबाबत आपली नाराजी दर्शवली आहे.