सुंदर आणि रम्य मोल्लेम

    दिनांक :05-Nov-2019
दोस्तांनो, गोव्यापासून काही किलोमीटर अंतरावर मोल्लेम नावाचं गाव आहे. कर्नाटक सीमेेजवळचं हे गाव खूप सुंदर आहे. इथे एक अभयारण्य आहे. हे अभयारण्य पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने इथे येतात. मोल्लेम गावात तुम्ही निवांत क्षण घालवू शकता. या परिसरात प्राचीन खडक पहायला मिळतात. हे खडक 3600 अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याचं म्हटलं जातं. इथल्या तांबडी सुरला परिसरात शंकराचं पुरातन मंदिर आहे. हे स्थान गोव्यातल्या कदंबा राजवटीचं प्रतीक मानलं जातं. 

 
 
मोल्लेमचं निसर्गसौंदर्य आपल्या नजरेत भरतं. दोन दिवसांच्या छोट्या ट्रिपसाठी हे स्थान अगदी योग्य आहे. इथे खूप धमाल करता येतो.
 
 
वीकेंडला कुठे जायचं हा प्रश्न पडला असेल तर मोल्लेमची निवड करता येईल. या ठिकाणी कोकण रेल्वेने जाता येईल. मडगाव रेल्वे स्थानकावरून मोल्लेम 50 किलोमीटर अंतरावर आहे. स्वत:च्या वाहनानेही या ठिकाणी जाता येईल. या प्रवासादरम्यान सुंदर निसर्ग अनुभवता येईल. तरुणाई नेहमीच हटके ठिकाणांच्या शोधात असते. अशा कलंदरांसाठी मोल्लेम हे ठिकाण योग्य ठरेल.