दुचाकी चोरास अटक

    दिनांक :05-Nov-2019
 
 
 
घुग्घुस, 
दुचाकी चोरणार्‍या अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात घुग्घुस पोलिसांना यश आले. रजनीकांत ऊर्फ भोला जितेंद्र गिरी (19) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
सोमवारी रात्री चौधरी पेट्रोल पंपावर आरोपी विना क‘मांकाच्या दुचाकीमध्ये पेट्रोल टाकत होता. पेट्रोल टाकून बाहेर निघताच त्याला पोलिसांनी अडवले. वाहनाबाबत चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. खाकी वर्दीचा धाक दाखविताच त्याने दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. शिवाय अन्य दोन दुचाकी घराच्या मागील भागात ठेवल्याचेही सांगितले. त्याने इंदिरानगरातील काही नागरिक बाहेरगावी गेले असता, त्यांच्या घरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
ही कारवाई ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील गौरीशंकर आमटे, सचिन बोरकर, सुधीर मत्ते, योगेश शार्दुला, सचिन अ‘ेवार, विनोद वानकर, रणधीर चौधरी यांनी केली.