पोलिसांच्या रजा अनिश्चित काळासाठी रद्द करण्याचे आदेश

    दिनांक :05-Nov-2019
 
 
चंद्रपूर,
राज्यातील पोलिसांच्या आजारी रजा वगळता इतर सर्वच रजा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात धडकले आहेत.
मागील दोन तीन महिने पोलिस कर्मचारी अधिक व्यस्ततेत होते. त्यामुळे अनेकांनी सुटीचे नियोजन केले. पण, मंगळवार, 5 नोव्हेंबरपासून आजारी रजा वगळता इतर सर्व प्रकारच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. जे अधिकारी, कर्मचारी सुटीवर गेले त्यांनी तातडीने ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश आहेत. त्यामुळे तडकाफडकी बरेच जण सुट्या संपण्यापूर्वीच रविवारपर्यंत तर काही सोमवारी सायंकाळपर्यंत परत येण्याची शक्यता आहे.
सहा दिवसांवर येऊन ठेपलेला ईद या सणाचा बंदोबस्त पोलिसांना सांभाळायचा आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी बैठका सुरू आहेत. रजा रद्द होणे ही नवी बाब नाही. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे मत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.