मलायका अरोराचं ड्रिम वेडिंग

    दिनांक :05-Nov-2019
बी-टाउनचं प्रसिद्ध जोडपं अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा नेहमी एकत्र दिसत असतात. तसेच त्यांच्या लग्नाच्या बातम्याही वारंवार येत असतात. मात्र, अर्जुन आणि मलायकाने लग्नाच्या निव्वळ अफवा असल्याचे सांगितले असले, तरी आता मलायकाने आता आपल्या लग्नाच्या स्वप्न पाहिले आहे आणि त्याबद्द माहितीही दिली आहे.
 
 
मी आणि अर्जुन आम्ही एका समुद्र किनाऱ्यावर अगदी साध्या पद्धतीने लग्न करणार आहोत असे मलायकाने नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये बोलताना स्पष्ट केले आहे. तिला लग्नात एली साब गाऊन परिधान करायचा आहे. तर तिच्या मैत्रिणींनी करवल्या बनावे असे तिची इच्छा आहे. तसेच तिची जीवलग मैत्रीण असलेली वाहबीद मेहता तिची बेस्ट वुमन असावे असे मलायकाला वाटते.
अर्जुन कपूरच्या फोटोग्राफीबद्दल बोलताना मलायकाने सांगितले की, अर्जुनला वाटते की, मला चांगली फोटोग्राफी करता येत नाही. अर्जुनत माझे छान फोटो काढतो असही ती म्हणाली.
सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असणारे मलायका आणि अर्जुन नेहमी एकमेंकाच्या पोस्टवर कमेट करत असतात. नुकतंच अर्जुन कपूरच्या अगामी 'पानीपत' या चित्रपटात त्याच्या लुकचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. यावर मलायकाने अर्जुनची स्तुती केली आहे. तर अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशी या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही पहिल्यांदा अर्जुन कपूर यांच्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी आपल्या नात्याविषयी सर्वांना सांगितले होते.