मंदिरा बेदीला मुलगी दत्तक घ्यायची आहे पण…

    दिनांक :05-Nov-2019
वयाच्या ४७व्या वर्षीही तितकीच हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मंदिरा बेदी. आजही मंदिरा बेदीकडे फिटनेस आयकॉन म्हणूनही पाहिले जाते. ‘शांती’ मालिकेपासून ते ‘क्यों की सास भी कभी बहुती’ मालिकेपर्यंत मंदिराने छोट्या भडद्यावर जादू केली होती. मंदिरा बेदीने १९९९ मध्ये चित्रपट दिग्दर्शक राज कौशलशी लग्न केले. मात्र आई होण्यासाठी मंदिराला तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. अखेर २००१ मध्ये मंदिराने मुलाला जन्म दिला.
 
 
 
आज मंदिराचा मुलगा ८ वर्षांचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून मंदिरा आणि तिचा पती मुलगी दत्तक घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मंदिराने हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. ‘मी आणि माझ्या पतीने मुलगी दत्तक घेण्यासाठी केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरणाकडे दोन वर्षांपूर्वी अर्ज केला होता. मात्र दुर्दैवाने ही प्रक्रिया पुढे गेलीच नाही. मी माझ्या कुटुंबामध्ये नवीन सदस्याला सामिल करण्यासाठी फार उत्साही आहे’ असा खुलासा मंदिराने केला. इतकच नव्हे तर मंदिराने तिच्या मुलीचे नाव तारा ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील सांगितले.
काही दिवसांपूर्वी मंदिरा पती आणि मुलासोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लूटत असल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये मंदिरा अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. या फोटोंवरुन फिटनेसविषयी जागरुक असल्याचे दिसून येते होते. नुकताच मंदिराचा ‘साहो’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.