वाघाने केली वासरांची शिकार

    दिनांक :05-Nov-2019
सेलू,
तालुक्यातील टाकळी (झडशी) येथील शेतकरी सुरेश मारोतराव बारई याची शेती मौजा बोथली मौजात असून शेतातील गोठ्यात रात्रीच्या वेळेस त्याचे गुरेढोरे बांधलेले असतात.  नेहमीप्रमाणे काल तारीख चारच्या रात्री सुद्धा दोण बैल, दोण गाई व दोण वासरू असे गोठ्यात बांधून होते, परंतु आज सकाळी सुरेश हा शेतात गेला असता त्याच्या एका वासराला वाघाने मागील बाजूस खाल्याचे दिसले. सदर शेतकऱ्याने याबाबत वनविभाच्या अधिकाऱ्यास माहिती दिली. त्यामुळे सदर घटणास्थळी अधिकारी आल्यावर घटनेचा पंचनामा केला.  परिसरातील शेतकर्यांच्या भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घोषणेमुळे आधीच कर्जात असलेल्या शेतकऱ्यांवर वाघाने नविनच समस्या निर्माण केल्याने वाघाचा बंदोबस्त करावा असी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे.