खरकाडा तलावात बुडून दोघांचा मृत्यू

    दिनांक :05-Nov-2019
 
 
 
नागभीड,
पार्टीत भोजन केलेली भांडी धुण्यासाठी तलावाच्या काठावर गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 5 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास नागभीड तालुक्यातील खरकाडा तलावाजवळ घडली. राजेंद्र गणपत कोसरे (28 रा. नांदेड), समिर बावणे (रा. बोथली) अशी मृत युवकांची नावे आहेत.
नागभीड तालुक्यातील नांदेड गावापासून कच्चेपारखरकाडा परिसरातील जंगल भागात एक तलाव आहे. या तलावात नांदेड गावातील पाच ते सात मित्र पार्टी करण्यासाठी गेले होते. निसर्गाचा आनंद लुटत त्यांनी सामूहिक भोजन केले. भोजनानंतर भांडी धुण्यासाठी काही मित्र तलावाच्या काठावर गेले. भांडी धूत असताना समिरचा तोल जाऊन तो खड्ड्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी समिरचा मेहुणा राजेंद्रने समिरला वाचविण्याचा प्रयत्न केला. वाचविण्याच्या नांदात राजेंद्रला खोल खड्ड्यात बुडाला. या दोघांना वाचविण्याचा प‘यत्न इतरांनी केला. पण, त्यांना यश आले नाही. भयभीत झालेल्या इतर मित्रांनी या दुदैवी घटनेची माहिती गावात दिली. गावकरी घटनास्थळाकडे रवाना झाले. पोलिसही घटनास्थळी पोहचले. मृतदेह तलावाबाहेर काढून पंचनामा करण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागभीड येथे पाठविण्यात आले. दिवाळीच्या सुट्टीमध्ये समिर बोथलीवरून नांदेडला आला होता. तपास नागभीड पोलिस करीत आहेत.