दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने अपघात; दोन युवकाचा जागीच मृत्यू

    दिनांक :06-Nov-2019
|
अहेरी,
आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील पातानील वळणावर दुचाकीच्या गंभीर अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. 

 
 
शंकर गुरनुले व संजय ढोके अशी या अपघातात मृत युवकांची नावे असून ते दुचाकीने भरधाव वेगाने आलपल्ली- कडून सिरोंचा मार्गावर जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून दोघेही सागवाणच्या झाडाला जबर धडक दिली. यात दोघांनाही जबर मार लागल्याने दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. पुढील तपास अहेरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रविण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.