नुकसान भरपाईची मागणीसाठी गावात 'दवंडी'

    दिनांक :06-Nov-2019
|
वर्धा,
दिवाळीच्या आनंदी परवावर परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतजाऱ्यांच्या नुकसान भरपाईत आणखी वाढ झाली. यात अगोदरच पिकांचे नुकसान झाले असताना कापणी करून ठेवलेले पीक पावसाने ओले झाल्याने कोंब फुटले. यासह  पावसामुळे पिकाच्या नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुरू करण्यात आले आहे. यासह याची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः द्यावी यासाठी शेतकऱ्यांनीही कृषी विभागाने द्यावी यासाठी गावात दवंडी पिटवून माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

 
 
 
आज मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया यासह डिजिटल इंडियाचा नारा देत अवलंब होत आहे. ग्रामीण भागात मात्र आज मात्र जुन्या पद्धतीने माहिती प्रसारण व्यवस्था राबविताना दिसून येत आहे. परतीच्या पावसने झालेल्या नुकसानीमुळे याची माहिती सर्व शेतकरी बांधवाना मिळावी यासाठी दवंडी पद्धत राबवली जात आहे. शेतकरी वर्ग आजही या सगळया नवीन जगापासून वेगळा असल्याने जुन्या पद्धतीचा अवलंब केल्याने दवंडीने माहिती सांगितली जाते आहे. संध्याकाळच्या वेळात लोक शेतातून गावात आले असताना दफळी वाजवत लोकांचे लक्ष वेधले जात आहे. यातून त्यांना नुकसानीचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. तरी ज्यांचे नुकसान झाले असेल त्यांनी स्वतःही कृषी विभागाची माहिती द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
 
या दवंडी पद्धतीने मात्र शेतकऱ्यांना माहिती मिळत आहे. पण याचा फायदा किती शेतकरी घेतील हे पाहणे गरजेचे असणार आहे.