वानरचुवा जंगलात वाघाने पाडला गाईचा फडशा

    दिनांक :06-Nov-2019
|
गिरड,
मोहगांव,ताडगाव,शिवणफळ, वानरचुवा या जंगलांमध्ये दिवसेंदिवस वाघाच्या संख्येत झपाट्याने वाढत होत चालली असुन जनावरांवर वाघाच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ होत असल्याने शेतकऱ्यांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वानरचुवा जंगलात पुन्हा वाघाने एका गायीला ठार केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. 
 
 
 
प्राप्त माहितीनुसार मंगळवारी (५ नोव्हेंबर) मोहगांव येथिल शेतकरी आशिष नाईक यांची गाय नेहमी प्रमाणे सकाळी वानरचुवा जंगलात कक्ष क्रमांक ३२० मध्ये चरण्यासाठी गेली असता सायंकाळी गाय घराकडे परतत असताना. वाघाने गायीवर हल्ला चढवित तिला जागीच ठार केले. यामुळे शेतकरी आशिष नाईक यांचे २५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. मंगरूळ येथिल श्रेत्रसाय्यक एस.एन.नरडंगे, वनरक्षक बि.एन.रजाडे, प्रकाश साहरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी नाईक यांनी वनविभागाला केली आहे.