अमेरिकेतील निवडणुकीत चार भारतीयांचा विजय

    दिनांक :07-Nov-2019
|
वॉशिंग्टन, 
अमेरिकेत मंगळवारी झालेल्या राज्य आणि स्थानिक निवडणुकीत एका मुस्लिम महिलेसह भारतीय वंशाच्या चार उमेदवारांचा विजय झाला आहे. व्हाईट हाऊसमधील तंत्रज्ञान धोरणाच्या माजी संचालकाचा समावेश आहे. 
 
 
 
समुदाय महाविद्यालयातील माजी प्राध्यापक आणि भारतीय वंशाच्या गझाला हाश्मी यांनी व्हर्जिनिया स्टेट सिनेटच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या राज्यातील सिनेटमध्ये जाणार्‍या पहिल्याच मुस्लिम महिलेचा विक्रम त्यांनी या विजयाच्या माध्यमातून घडवला. व्हाईट हाऊसमधील तंत्रज्ञान धोरणाचे माजी संचालक सुहास सुब्रमण्यम्‌ यांनी व्हर्जिनिया राज्यातील प्रतिनिधी सभागृहाची निवडणूक जिंकली आहे.
 

 
 
 
डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हाश्मी यांनी पहिल्याच प्रयत्नात रिपब्लिकन पक्षातील राज्याचे सिनेटर ग्लेन स्टुअर्टव्हॅन्ट यांचा व्हर्जिनियातील दहाव्या सिनेट जिल्ह्यातून पराभव करीत संपूर्ण अमेरिकेचे लक्ष आपल्याकडे वेधले.
 
गझाला हाश्मी म्हणजे, हैदराबादच्या मुन्नी
  
अमेरिकेला जाण्यापूर्वी गझाला हाश्मी यांना हैदराबादमध्ये मुन्नी या नावाने ओळखल्या जायच्या. त्या मागील 50 वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहेत.
 
 
व्हर्जिनियामध्ये भारतीय, हिस्पॅनिक्स आणि कोरियन लोकांची मोठी सं‘या आहे. इमिग्रेशन हा तिथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पूर्ण वेळ राजकारणात उतरण्यासाठी त्यांनी अलिकडेच शिक्षण क्षेत्रातील आपली नोकरी सोडली. गझाला यांनी जॉर्जिया विद्यापीठातून इंग्लिशमध्ये बी. ए. ची पदवी घेतली. हाश्मी यांचे पती अझर 1991 साली रिचमॉंड येथे स्थायिक झाले.