भाजप कोणताही घोडेबाजार करणार नाहीः देवेंद्र फडणवीस

    दिनांक :08-Nov-2019
|
 

 
 
मुंबई, 
राज्यात  पुढचे सरकार भाजपचेच असेल असा विश्वास व्यक्त करतानाच सरकार बनवण्यासाठी भाजप कोणताही घोडेबाजार करणार नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. दरम्यान भाजपकडून आमदारांच्या फोडाफोडीचा प्रयत्न सुरू असल्याचे सर्व आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत . फोडाफोडीचे राजकारण आम्ही कधीही केलेले नाही. याबाबत जर कुणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते जाहीर करावेत, असे आव्हानही फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्रात जे नवे सरकार येईल ते भाजपच्या नेतृत्वाखालीच येईल. हा माझा विश्वास आहे, असेही फडणवीस पुढे म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याचे मी आभार मानतो. त्याचवेळी सरकार स्थापन होण्यासाठी जो विलंब होत आहे, त्यास कुणीही कारणीभूत असले तरीही जनतेला अद्याप आम्ही सरकार देऊ शकलो नाही, याची माझ्या मनात खंत आहे, असेही फडणवीस म्हणाले. केले.