व्यापाऱ्यांच्या अटकेमुळे व्यापारी वर्गामध्ये रोष

    दिनांक :08-Nov-2019
|
घटनेचा निषेध करीत दुकाने केली बंद
आर्वी,
आर्वी नगरपालिकेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता व चौकशी न करता सरळ दुकानात जाऊन त्या सात व्यापाऱ्यांना नियमबाह्यपणे पोलिसांन ठाण्यात आणले. या घटनेमुळे लागलीच व्यापारी वर्गात रोशाचे वातावरण निर्माण झाले त्याचे पर्यावसन उस्फूर्तपणे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून रोष व्यक्त केला. पोलिस ठाण्यात व्यापाऱ्यांनी गर्दी करून या घटनेचा निषेध केला.
 
 
 
 
येथील नेताजी सुभाष चंद्र बोस मार्केटमधील दुकानाच्या वर बांधकामाची मंजुरी द्यावी त्यासाठी नगरपालिकेची ठरलेली रक्कम नियमानुसार भरण्यास तयार असल्याचे अर्ज सफदर हुसेन उज्वल मालानी दर्शन मालानी अविनाश जयसिंगपुरे चांद भाई चंदन लोहे घनश्याम वधवा आदींनी अर्ज सादर केला मात्र त्यावर दोन महिन्यापासून कोणतीही कार्यवाही नगरपालिकेने केली नाही त्यामुळे या व्यापाऱ्यांनी बांधकाम सुरू केले मात्र नगरपालिकेच्या काही नगरसेवकांनी याबाबत दबाव आणून हे बांधकाम अवैध असल्याचे सांगितले असता नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी या सातही व्यापाऱ्यांना नोटीस देऊन 12 नोव्हेंबर पर्यंत बांधकाम काढा अन्यथा त्याला आम्ही तोडू अशा आशयाची नोटीस दिली.
 
मात्र मुदतीपूर्वीच मुख्याधिकारी यांनी पोलीस स्टेशनला या व्यापारा विरोधात एफ आय आर नोंदवून ठाणेदार यांनी हे प्रकरण चौकशीसाठी ठेवले मात्र त्यांच्यावर काही नगरसेवकांनी दबाब आणला असता त्यांनी सातही व्यापाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली या घटनेने व्यापारी वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे या नियमबाह्य घटनेमुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी मुख्याधिकारी अंधारे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता.