साखरेचं खाणार त्याला...

    दिनांक :08-Nov-2019
|
साखरेचं खाणार त्याला देव देणार’ असं म्हटलं जातं. पण प्रत्येक वेळी साखर लाभदायी ठरते असं नाही. असे पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याने आपल्याला मरगळ येते. थकवा आल्यासारखं वाटतं. अशा परिस्थितीत स्वत:ला दोष देत बसण्यापेक्षा शरीरात साठलेली ही अतिरिक्त साखर बाहेर काढण्याचेे साधे उपाय करता येतील. या उपायांविषयी... 

 
 
  • ताणतणाव वाढल्यावर गोड खावसं वाटतं, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. हे टाळण्यासाठी मेडिटेशन, योगा किंवा श्वसनाचे व्यायाम करता येतील.
  • खूप गोड खाल्यानंतर काही काळाने पुन्हा भूक लागली की प्रक्रिया केलेलं अन्न खाण्याची तीव्र इच्छा होते. पण प्रक्रिया केलेलं अन्न आरोग्यासाठी हानिकारक मानलं जातं. हे टाळण्यासाठी घरी बनवलेलं साधं अन्न खा. वेफर्स, बिस्किटं, चॉकलेटसारखे पदार्थ खाल्ल्याने तुमचा त्रास वाढेल. त्यामुळे सकस आहारावर भर द्या.
  • आहारात प्रथिनं आणि फायबरचा समावेश करा. फायबर आणि प्रथिनांचं पचन व्हायला वेळ लागतो. यामुळे शरीरातली रक्ताची पातळी नियंत्रणात रहायला मदत होते. सातूच्या पिठाची पोळी, पनीर, पालक; सफरचंदासारखी फायबरयुक्त फळं आणि प्रथिनांनी युक्त असे चणे, शेंगदाण्यासारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.
  • साखरेच्या अतिप्रमाणामुळे आतड्यांवर वाईट बॅक्टेरियांची वाढ होते. यामुळे तुमच्या मानसिक कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी आहारात दही, दुधाचा समावेेश करा.