विजेच्या प्रवाहचा झटका लागुन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

    दिनांक :08-Nov-2019
|
गिरड, 
परिसरातील दसोडा शेतातील पिकांना पाणी देत असलेल्या शेतकऱ्याला त्याच्याच शेतातील विघुत प्रवाहचा झटका लागुन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. मुत्यक शेतकऱ्यांचे नाव बापुराव चौधरी असे आहे. या घटनेने गावात हळहळ निर्माण झाली आहे.
 
 
 
प्राप्त माहितीनुसार ७ नोव्हेंबरला बापुराव चौधरी हे त्याच्याच शेतात शेतपिकांना पाणी देण्याकरिता गेले होते. पिकाला पाणी देत असतात त्याच्या शेतात असलेल्या विघुत ताराचा बापुराव चोधरी यांच्या पायाला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. बापूराव चौधरी यांच्याकडे अडीच एकर शेती असून या शेतीच्या भरोशावर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालत होता. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून गिरड पोलिसाना पाचारण केले. गिरड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिपक निंबाळकर यांनी कर्मचाऱ्यांसह रात्री घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास गिरड पोलिस करीत आहे.