ओल्या दुष्काळाला कंटाळून शेतक-याने संपवीली जीवनयात्रा

    दिनांक :08-Nov-2019
|
उंबडाॅबाजार, 
कारंजा लाड ग्रामीण पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणा-या ग्राम दुघोरा येथील शेतक-याने सततची नापीकी व ओल्या दुष्काळा धसका घेवून स्वतः च्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सविस्तर असे की ग्राम दुघोरा येथील युवा शेतकरी श्रीकृष्ण रंगराव पुंड यांच्याकडे ३० एकर शेती असुन शेतीसाठी त्यांनी जिल्हा बॅंकेचे कर्ज घेतले होते. सतत पाऊस सुरू असल्याने शेतातील सोयाबीनची गंजी ओली झाल्यामुळे जवळपास १५० ते १७० पोते सोयाबीन सडल्यामुळे अंदाजे ५ लाख रूपयांचे नुकसान झाले. त्यातच त्याच्या पायाला सुध्दा दुखापत झाल्याने उपचारासाठी एक ते दिड लाख रूपये खर्च लागला.
 


 
सततची नापीकी , ओला दुष्काळ व बॅंकेचे कर्ज कसे फेडावे याची चिंता लागल्याने अखेर श्रीकृष्ण पुंड या शेतक-याने गळफास लावून आत्महत्या केली. मृतक शेतकरी श्रीकृष्ण पुंड यांचे मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी वडील भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. घटनास्थळाला कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी भेट दिली. या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी  आकस्मित मृत्यूची नोंद करून घटनेचा पुढील तपास उंबडाॅबाजार पोलीस चौकीचे जमा दार शेषराव जाधव व पो .काॅ. पवण तायडे करीत आहे.