आजयुष्यमान खुराणाने टाकले राजेश खन्नाला मागे

    दिनांक :09-Nov-2019
|
हिंदी सिनेमामध्ये राजेश खन्नांच्या नंतर बॉलिवूडचा हिरो म्हणून आयुष्मान खुरानाकडे पाहिले जाते. सलग सात हिट सिनेमे देणाऱ्या आयुष्मान खुराना हा दुसरा कलाकार आहे. एवढंच नव्हे तर आयुष्मान खुरानाने अमिताभ बच्चन यांचा देखील रेकॉर्ड तोडला आहे. अमिताभ यांचे सलग सहा सिनेमे हिट झाले होते यानंतर आयुष्मान खुरानाचे सलग 7 सिनेमे हिट झाले आहेत.
 
 
आयुष्मान खुरानाचा 'बाला' हा सिनेमा त्याच्या करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. आयुष्मान खुराना हा बॉलिवूडला मिळालेला 'परिस' आहे. तो ज्या सिनेमांना हात लावतो तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होतो. 'ड्रीम गर्ल' या सिनेमानंतर सलग हिट सिनेमे देत हॅट्रिक केली आहे. 'बाला'ने देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 'बाला' सिनेमाने 'ड्रीम गर्ल'चा रेकॉर्ड देखील तोडला आहे.
'स्त्री' सिनेमातून दिग्दर्शनात डेब्यू केलेल्या अमर कौशिकच्या 'बाला' सिनेमाने पहिल्या दिवशी 10 करोड 15 लाख रुपयांची कमाई केली आहे. 'ड्रीम गर्ल'ने पहिल्या दिवशी 10 करोड 5 लाख रुपयांची कमाई केली आहे. 10 लाख 'बाला' सिनेमाने जास्त कमाई केली आहे.