डिंपल कपाडियाच्या आईचे निधन

    दिनांक :01-Dec-2019
|
मुंबई,
चित्रपट सृष्टीतील जुन्या काळजी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची आई बेट्टी कपाडिया यांचे शनिवारी निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून बेट्टी कपाडिया आजारी होत्या. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने  हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
  
 
बेट्टी कपाडिया यांचा विवाह गुजराती व्यापारी चुन्नीभाई कपाडिया यांच्याशी झाला होता. त्यांना डिंपल, सिंपल, रीम आणि मुन्ना अशी चार अपत्ये होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कुटुंबीयांसमवेत लोणावळा येथे आपला 80 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या वाढदिवसाची छायाचित्रे ट्विंकल खन्ना यांनी समाज माध्यमांवर शेअर केली होती. यात बेट्टी आपल्या लाडक्या नातजावई अक्षय कुमार याच्यासोबत दिसत होत्या.