न्यूमोनियाचा घातक आजार

    दिनांक :13-Dec-2019
|
कॉलरा हा अत्यंत घातक असा विकार आहे. व्हायबिरीयो कॉलरा नामक बॅक्टेरियामुळे हा विकार होतो. अन्न किंवा पाण्याच्या माध्यमातून हे बॅक्टेरिया शरीरात जातात. कॉलराविषयी जाणून घेऊ या... 
 
numonioa _1  H
 
 
ओळख : कॉलराची लागण झाल्यानंतर शरीरातून मोठ्या प्रमाणावर पाणी निघून जातं. यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. या रोगाचे बॅक्टेरिया शरीरात गेल्यानंतर 12 तास ते पाच दिवसांनंतर लक्षणं दिसू लागतात.
 
 
कारणं : अस्वच्छता हे कॉलराचं अत्यंत महत्त्वाचं कारण मानलं जातं. घनकचरा व्यवस्थापनाचा अभाव, बॅक्टेरियायुक्त पाणी किंवा अन्नाचं सेवन, स्वच्छतागृहांचा अभाव, घाणेरड्या पाण्यात वाढलेल्या भाज्यांचं सेवन ही कॉलराची कारणं आहेत. अर्धवट शिजवलेले मासे खाल्ल्याने कॉलरा होऊ शकतो. शिंपल्यांच्या सेवनामुळे कॉलरा पसरण्याची शक्यता सर्वाधिक असते. कच्ची आणि न धुतलेली फळ, भाज्या या विकाराला कारणीभूत ठरू शकतात.
 
 
लक्षणं : कॉलराची लागण झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये लक्षणं दिसू लागतात. काही रूग्णांमध्ये पाच दिवसांनंतर ही लक्षणं दिसू लागतात. उलट्या आणि जुलाब, हृदयगती वाढणं, त्वचेची लवचिकता कमी होणं, शरीरातलं पाणी निघून गेल्याने त्वचा निळी पडणं, हातांवर सुरकुत्या पडणं, रक्तदाब कमी होणं, तहान लागणं, स्नायूंमध्ये गोळे येणं, मूत्राचं प्रमाण कमी होणं ही या विकाराची सर्वसाधारण लक्षणं आहेत.
 
 
प्रतिबंध : कॉलराचे 80 टक्के रूग्ण योग्य औषधोपचारांनी बरे होऊ शकतात. कॉलराविरोधी लसही उपलब्ध आहे. अर्थात जागतिक आरोग्य संघटनेकडून याला मान्यता नाही. ही लस फार प्रभावी नसल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. उकळलेलं पाणी पिणं, पुरेशी स्वच्छता राखणं, भाज्या स्वच्छ धुवून आणि शिजवून खाणं, अर्धवट शिजवलेले मासे न खाणं, जेवणाआधी हात स्वच्छ धुणं अशा उपायांनी कॉलराला प्रतिबंध करता येऊ शकतो.