खाण्याची गोष्ट

    दिनांक :13-Dec-2019
|
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
 
"उष्टं- माष्टं - खरकटं खायला देऊ नको, पाप लागते’’ अशी एक परिचित व्यक्ती कायम सांगायची. उष्टं का खाऊ नये?
गरज असून देखील काही कारणांनी, वारंवार हात धुतले जात नाहीत. केवळ एका व्यक्तीचं उष्टं दुसर्‍याने खाऊ नये, याचे शास्त्रीय कारण असे आहे, की- एका व्यक्तीच्या हातात जे काही जंतू आहेत, ते दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात शिरून त्या व्यक्तीला हानिकारक ठरून, पोटाचे विकारांचे वहन करू शकतात. जंत, कृमी पसरवू शकतात. 

khana_1  H x W: 
 
 
परदेशातले लोक काट्या-चमच्यांनी खातात. सुरीने तुकडे करतात आणि ते तुकडे स्वतंत्र प्लेटमध्ये घेऊन खातात.
त्यामुळे तिथे एकच डिश शेअर केली, (जर ती केली तर अर्थात ते क्वचितच होते) तरीही ते खाणे फारसे हानिकारक नसते.
आपल्या देशात आपण हाताने जेवतो. त्यामुळे तोच जेवणाचा घास, आपल्या तोंडापर्यंत जात असतो. अनेक जंतू एकमेकांच्या उष्टे खाण्यातून जाऊ शकतात.
 
 
एका कथेत देखील एक दुष्ट स्त्री नावडत्या मुलाला, सगळ्यांच्या ताटातून उरलेल्या, पातेल्यात जमवलेल्या, खरकट्याचे जेवण एकत्र करून त्याचा मोठा लाडू करून जेवायला वाढत असते. एकमेकांचं उष्टं खाल्ल्यामुळे जंतू पसरतात. मात्र, बरेचदा उष्टं खाल्ल्यामुळे प्रेम वाढतं, असं सांगून घरच्या पत्नीला, घरच्या पुरुषाने टाकलेल्या जेवणातील अन्न खावं लागतं. त्यामुळे पती-पत्नीचं प्रेम वाढतं, असा समज. ज्यामुळे ती स्त्री उरलेल्या अन्नाला गोड मानून खाईल. पुस्तकांमध्ये सुद्धा दुसर्‍याचं उष्टं खाऊ नये, ताटातील उरलेला शेवटचा घास खाऊ नये, अशा सूचना दिलेल्या असतात. काही घरी तर जेवताना काही अन्न ताटात पाठीमागे सोडणं, ही देखील पद्धत, रूढी समजली जाते.
 
 
काही ठिकाणी जेवण झाल्यावर ताटात पाणी टाकून ते पाणी देखील विसळून प्यायची पद्धत आहे. तो एक प्रकारे अन्नाचा आदर करणं आणि अन्न वाया घालू न देणेच आहे.
 
 
जे काही माझ्या ताटात तुला शेअर करायचे असेल, ते मी खायला सुरुवात करण्याच्या आधीच कर. मी खात असताना मला शेअर करायला आवडत नाही. असं क्ष व्यक्ती य व्यक्तीला म्हणाली. य व्यक्तीला बोलताना ठणकावून सांगताना मनात शंका आली आणि मनात विचार आला, असं ही स्त्री का म्हणते आहे? त्यामुळे तिचे निरीक्षण करत होते. शेवटी क्ष नावाच्या त्या व्यक्तीने भरपूर अन्न वाया घालवलं, मात्र त्या य मैत्रिणीला मात्र तिने ते खाऊ दिलं नाही.
 
 
अन्नाची नासाडी करेपर्यंत अन्न ताटात घेणं, मग ते उष्टं करणं आणि वाया घालवणं, यापेक्षा आवश्यक तेवढंच अन्न ताटात घेतलं तर अन्न वाया जाणार नाही.
 
एखादा पदार्थ पाहुणे मंडळींना हाताने देण्याऐवजी त्यासाठी चमचाचा वापर केला गेला, तर सर्वोत्तम. कारण अशावेळी तो पदार्थ घेणार्‍याचे मनही तो पदार्थ खाण्यासाठी आढेवेढे घेतं.
 
 
हाताने मिठाई वाढणं किंवा एखादी व्यक्ती जेव्हा हाताने तुकडा तोडून सँडविचचा तुकडा किंवा वडापावचा तुकडा देते, तेव्हा हात स्वच्छ असणे गरजेचे आहेत. सुरीने किंवा चमच्याने भाग करून ते द्यायला हरकत नाही आणि उष्ट खाणे ही काही व्यक्तींची आवड, परिस्थिती आणि मजबुरी असते.
 
 
ज्यामुळे उष्ट खायची वेळ इतर कुणावर तरी येईल. अन्नधान्य खूप महाग असतं. शेतकरी मोठ्या कष्टाने धान्य पिकवतो आणि ते वाया जाऊ नये, असं मला वाटतं. आवश्यक तेवढेच जेवण वाढून घ्यावे आणि उधळमाधळ करू नये.