जिमला न जाताही लाभते दीर्घायुष्य

    दिनांक :13-Dec-2019
|
जर तुम्हाला स्वतःला निरोगी ठेवायचे असेल, तर जिमला जाण्याची काहीही गरज नाही. हे आम्ही नाही तर केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वेक्षणानुसार, सर्वाधिक आयुष्य जगणारी लोक जिमला जात नाही. 

jim _1  H x W:  
 
 
2018 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात हा तो झोन आहे, जेथे लोक सर्वाधिक वर्ष जगतात. यामध्ये ओकिनाव्हा (जापान), नीकोया (कोस्टा रिका), इकारिया (ग्रीस) या भागातील लोकांचा समावेश आहे.
 
 
यांच्यावर केलेल्या रिसर्चनुसार, येथे लोक जिमला जात नाही, तसेच मॅरोथॉनमध्ये देखील भाग घेत नाहीत. तर त्या ऐवजी ते शारीरीक हालचाली जसे, की- गार्डिंनग, पायी चालणे, घर आणि बाहेरील कार्य मशिन्सच्या जागी हातांनी करणे या गोष्टी करतात.
रिसर्चमध्ये समोर आले, की- अधिक काळ निरोगी जगायचे असेल तर मशीनऐवजी हातांनी काम करणे गरजेचे आहे. असे असले तरी, 100 वर्षांपूर्वी 90 टक्के लोक पायी चालणे अथवा इतर शारीरिक कार्यामध्ये भाग घेत असे. मात्र आज केवल 10 टक्के लोक असे करतात.
 
 
तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की- तुम्ही देखील दररोज 15 मिनिटे चालणे, तसेच घरातील सामान घेऊन येणे, मुलांना शाळेत चालत सोडायला जाणे इत्यादी गोष्टी करू शकता.
 
 
अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, आठवड्यातून 6 तास चालणे हे कॅन्सर, हृदयाचे आजार इत्यादी गोष्टी कमी करते. एवढेच नाही तर चालल्याने तुमचा मेंदू देखील अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतो. त्यामुळे जेवढे शक्य आहे, तेवढे चालणे गरजेचे आहे.