नेहरू कुटुंबावर टिप्पणी, अभिनेत्रीला अटक

    दिनांक :15-Dec-2019
|
अहमदाबाद,
बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला राजस्थान पोलिसांनी येथून आज सकाळी अटक केली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात पायलने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी रविवारी सकाळी तिला अटक केली. स्वतः पायने तिला अटक केल्याचे ट्वीट करून सांगितले आहे.  
 
payal rohtagi_1 &nbs
 
अभिनेत्री पायल रोहतगीने मोतीलाल नेहरू यांच्याविषयी एक वादग्रस्त व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायल रोहतगी विरूद्ध तक्रार दाखल दिली होती. त्यानंतर आयटी कायद्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी रविवारी गुजरातमधील अहमदाबाद येथून तिला ताब्यात घेतले.
 
 
 
पोलिसांनी अटक केल्यानंतर पायलने पंतप्रधान ऑफिस आणि गृह मंत्रालयाला टॅग करून ट्वीट करत म्हटले की, मला राजस्थान पोलिसांनी मोतीलाल नेहरू यांच्यावर व्हिडिओ बनवला म्हणून अटक केली. मी जे बोलले ती सर्व माहिती गूगलवरून घेतली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एक थट्टा राहिली आहे, असे रोहतगीने म्हटले आहे.
 
 
 
गुन्हा दाखल झाल्यानंतर पायल रोहतगीने बुंदी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार होती. मात्र, ती सुनावणी झाली नाही. आता या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
अभिनेत्री पायलने देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या वडिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तिने एक व्हिडिओ शेअर करत दावा केला की, मला वाटतं की मोतीलाल नेहरू यांच्या पाच पत्नी होत्या, म्हणून काँग्रेस सरकार तिहेरी तलाकच्या विरोधात होते. यासोबतच मोतीलाल नेहरू हे जवाहरलाल नेहरू यांचे सावत्र वडील होते. पायलने आपल्या या दाव्यात एलिना रामाकृष्णाने लिहिलेल्या आत्मचरित्राचा उल्लेख केला होता.