प्रिती झिंटाने नाकारली होती 600 कोटी रुपयांची संपत्ती

    दिनांक :15-Dec-2019
|
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आहे. गालावर पडणाऱ्या खळ्यांमुळे डिंपल गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रीती फक्त आयपीएल सामन्यांवेळी किंग्ज पंजाब इलेव्हन संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात दिसते. अभिनय आणि व्यवसाय याशिवाय प्रिती झिंटा बीबीसीसाठी लेखनही करत होती. तिने एकदा तब्बल 600 कोटी रुपयांची संपत्ती स्वीकारण्यास नकार दिला होता.
 
 
preity zinta_1  
 
शानदार अमरोही यांच्या निधनानंतर 600 कोटींची संपत्ती तिच्या नावावर होणार होती. प्रिती झिंटाला शानदार अमरोहींची दत्तक मुलगी असल्याचंही म्हंटले जात होते. कमाल अमरोही यांच्या अमरोही स्टुडिओच्या वादात प्रितीने शानदार अमरोहींची बाजू घेतली होती. त्यामुळेच 600 कोटींची संपत्ती प्रितीच्या नावावर करण्याचा निर्णय शानदार अमरोहींनी घेतला होता. मात्र, प्रितीने ही संपत्ती स्वीकारली नाही.
 
व्यवसाय, अभिनय क्षेत्रात काम करणारी प्रिती झिंटा सामाजिक कार्यही करत असते. तिने ऋषिकेश येथील एका अनाथ आश्रमातील 34 मुलींना 2009मध्ये दत्तक घेतले होते. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिने घेतली आहे. केवळ अभिनय आणि व्यवसायातच नव्हे तर प्रिती झिंटाने शिक्षणातही आपला ठसा उमटवला आहे. 2010 मध्ये इस्ट लंडन युनिव्हर्सिटीने तिला मानद डॉक्टरेट देऊन गौरव केला आहे. प्रिती झिंटाने हार्वर्ड युनिव्हर्सिटीत एक कोर्सही केला आहेत. तिने डील मेकिंग आणि निगोशिएटिंगचे शिक्षण या ठिकाणी घेतले आहे.