अभिनेत्रीला पाहून मुलांनी केला पाठलाग

    दिनांक :16-Dec-2019
|
मुंबई,
सेलिब्रिटींना स्टारडम त्यांच्या चाहत्यांमुळेच मिळतं असतं. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीप्रती चाहत्यांचे असणारे वेडेपण अनेकदा स्टार्सना अडचणीत आणतं. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरसोबतही घडले. काही मुलांनी बाइकवरून वाणीच्या गाडीचा पाठलाग केला. त्यांनी वाणीच्या गाडीचा एवढा वेळ पाठलाग केला की अखेर वाणीला तिची गाडी थांबवावी लागली.
 

vani kapoor _1   
याचवर्षी मे महिन्यात तिच्यासोबत असाच एक प्रसंग घडला होता. यानंतर वाणीने पाठलाग करणाऱ्या चाहत्याची पोलिसांत तक्रार केली होती. आता पुन्हा एकदा अशाच एका प्रसंगाला तिला सामोरं जावं लागलं आहे. मानव मंगलानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून वाणीचा हा व्हिडिओ शेअर केला. यात वाणी पूर्ण तयार होऊन कोणत्या कार्यक्रमाला जाताना दिसत होती. त्याचवेळी काही मुलांनी बाइकवरून वाणीच्या गाडीचा पाठलाग केला. यानंतर वाणीने गाडी थांबवून त्या मुलांसोबत सेल्फी काढला.
वाणी सेल्फी काढत असताना एका मुलाने अचानक गाडीच्या खिडकीतून आत डोकं घातले आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला वाणी त्या सर्वांना पाहून घाबरली, पण नंतर सगळ्यांशी हात मिळवत त्यांना सेल्फी दिला. या संपूर्ण प्रसंगावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी वाणीचे कौतुक केले, तर काहींनी चाहत्यांच्या अशा वागण्यावर खडे बोल सुनावले आहेत.