'फायटर'मध्ये विजय देवरकौंडासोबत झळकणार जान्हवी कपूर

    दिनांक :16-Dec-2019
|
मुंबई,
बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेऊन जवळपास एक वर्ष पूर्ण झाले असतांना जान्हवी कपूर आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही पदार्पण करायला सज्ज झाली आहे. गेल्या वर्षी धडक चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली होती. आता ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार विजय देवरकौंडासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
 

janhavi kapoor_1 &nb 
 
मीडिया रिपोर्टनुसार, पुरी जगन्नाथ दिग्दर्शित 'फायटर' सिनेमात जान्हवी कपूर ही विजय देवरकौंडा रोमान्स करताना दिसणार आहे. पुरी यांची पहिली पसंत जान्हवी नव्हती. त्यांनी सुरुवातीला कियारा आडवाणी आणि आलिया भट्टला या भूमिकेसाठी विचारले होते. मात्र दोघींनीही सिनेमात काम करायला नकार दिला.
यानंतर करण जोहरने जान्हवीचे नाव सुचवले. जान्हवीने सिनेमासाठी वेळ काढला नसला तरी, असे म्हटले जाते की, फेब्रुवारी २०२० पासून ती या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. विजय आणि जान्हवीसोडून सिनेमातील स्टारकास्टबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.